Breaking News

जबाबदारी सामाजिक दायित्वाची; तयारी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याची!

शिव जन्मोत्सवानिमित्त छ. संभाजीराजे  यांच्या उपस्थित वाजणार यावर्षी सनई चौघडा

माजलगाव : शिवजन्मोत्सव निमित्त गत 7 वर्षापासून माजलगावात बाळू  ताकट या युवकाच्या पुढाकारातून सामाजिक दायित्व म्हणून निशुल्क सर्वधर्मीय विवाह सोहळे पार पडत आहेत.या वर्षीही सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून कोरोना महामारी च्या नियमाच्या चौकटीत खा.छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत येत्या 21 फेब्रुवारी रोजी सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात सनई चौघडा वाजणार आहे.


गेल्या सात वर्षापासून शिव सेवा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तालुका परिसरातील गोरगरीब  नागरिकांना वरदान ठरणारा सर्वधर्मीय विवाह सोहळा केला जात आहे.यावर्षी कोरोना महामार्गचे संकट असले तरी नियमांच्या चौकटीत ही परंपरा पुढे नेण्यात येणार आहे.त्या निमित्त सोहळ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.येत्या 21 फेब्रुवारी रोजी खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.त्यापूर्वी,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गात मुंबईच्या विशेष ढोल पथकाच्या गजरात व अनेक देखाव्यांच्या साक्षीने महाराजांची मिरवणूक निघणार आहे.

तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे 21 रोजी च्या विवाह सोहळ्यात गेल्या 7 वर्षापासून विवाह सोहळ्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय इस्पितळातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सन्मान बहाल करण्यात येणार आहे.कोरोना महामारीचे संकट अंगावर आले असल्याने यावर्षी नियमांची चौकट पाळणे गरजेचे आहे.त्यामुळे अत्यंत गरजुवंतांनी लवकरात लवकर  नाव नोंदणी करून या विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक बाळू ताकट यांच्यासह प्रशांत होके, राहुल मुगदिया,सुरज पवार अमर राजमाने दत्ता होके, युवराज नरवडे, बल्ली होके, प्रसाद सावंत, यांनी केली आहे.

No comments