Breaking News

लखन सोनवणे खून प्रकरणातील आरोपीला युसुफवडगाव पोलिसांनी पुण्यात केले जेरबंद


गौतम बचुटे । केज

केज तालुक्यातील माळेगाव शिवारात खून करून प्रेत गव्हाच्या पिकात फेकून दिले होते त्यातील आरोपीला युसुफवडगाव पोलीसांनी पुण्यातून अटक केली आहे.

मयत लखन सोनवणे

दि.१५ फेब्रुवारी सोमवार रोजी केज-कळंब रोडवर  साळेगाव ते माळेगाव दरम्यान तुकाराम गुंठाळ यांच्या सर्व्हे नं. ४१ मधील पेरूच्या बागे जवळ गव्हाच्या शेतात कळंब येथील पुनर्वसन सावरगाव जि. उस्मानाबाद येथील  एक २८ वर्ष वयाच्या इसमाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस स्टेशनला गु र नं २४/२०२१ भा दं वि ३०२ व २०१ नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध खून करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान लखन सोनवणे याच्या खून प्रकरणी आरोपींने घटना स्थळावर कोणताच पुरावा ठेवला नसल्याने आरोपी पकडणे हे पोलीसांसमोर आव्हान होते.


परंतु युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी जेष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे आणि विजय आटोळे 6यांनी अत्यंत गुप्तपणे सर्व माहिती काढून तपास केला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स याच्या आधारे आरोपी निष्पन्न केला. मात्र आरोपीने खून करताच तो पुणे येथे फरार झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सीमा कोळी, बालासाहेब ढाकणे, मेहेत्रे व खनपटे यांनी तपास करून यातील आरोपी साईनाथ जयसिंग गायकवाड रा. पुनर्वसन सावरगाव, कळंब याला पुण्यातील आकुर्डी येथून ताब्यात घेतले.  सदर प्रकरणी अत्यंत कमी वेळेत शिताफीने सर्व माहिती काढून दोन दिवसात युसुफवडगाव पोलीसांनी लखन सोनवणे याचा खून करून पुण्याला पळून गेलेला आरोपी साईनाथ गायकवाड यास ताब्यात घेतले. त्यामुळे युसुफवडगाव पोलीसांचे कौतुक होत आहे.






No comments