Breaking News

महिलांना सक्षमपणे काम करण्यासाठी चांगल्या आरोग्याची गरज ---सौ. विजेता विजयसिंह पंडित

गेवराईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून  महिलांची मोफत आरोग्य तपासणी  गेवराई :  महिलांना सक्षमपणे काम करण्यासाठी चांगल्या  आरोग्याची गरज आहे. संक्रातीच्या सणाचे औचित्य साधून शारदा प्रतिष्ठान, तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस  व राष्ट्रवादी डॉक्टर  सेलने ' वाण आरोग्याचे ' हे महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेऊन महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे, त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन सौ. विजेता विजयसिंह पंडित यांनी केले तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस श्रीमती प्रज्ञाताई खोसरे म्हणाल्या की, महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागृत राहिले पाहिजे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसने महिलांच्या आरोग्य तपासणीचे काम हाती घेतले आहे त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. गेवराई येथील महिला महाविद्यालयात ' वाण आरोग्याचे ' या महिलांच्या  मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या.


संक्रातीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठान, राष्ट्रवादी महिला आघाडी व राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ' वाण आरोग्याचे'  या महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक १४ फेब्रुवारी  रोजी गेवराई येथील महिला महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर  सौ. विजेता विजयसिंह पंडित, कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ. सविता बाळासाहेब मस्के, महिला व बालकल्याण सभापती सौ. यशोदाबाई बाबुराव जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस श्रीमती प्रज्ञाताई खोसरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती विजयाताई जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती पुष्पाताई जाधवर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी सौ. विजेता पंडित यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित डॉक्टरांनी बारा तपासणी कक्षात  महिलांची आरोग्य तपासणी केली. यात शंबर पेक्षा जास्त महिलांची दुपारपर्यंत  तपासणी करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अजयसिंह पंडित, त्वचारोग तज्ञ डॉ. पद्मांजली अमरसिंह पंडित, स्त्रीरोग तज्ञ डॉ. गोविंद लेंडगुळे, डॉ. गायत्री लेंडगुळे, अस्थीरोग तऋ डॉ. मुकेश कुचेरिया, मधुमेह तज्ञ डॉ. धनंजय माने, आहार तज्ञ डॉ. वर्षा माने,  स्त्री रोग तज्ञ डॉ. संध्या रांदड, डॉ. चिंचोळे, डॉ. प्रशांत मुदकोंडवार , डॉ. अशोक काळे,  डॉ. रचना मोटेे, डॉ.  विजयालक्ष्मी घोक्षे,  डॉ. बालाजी जाधव, डॉ.  सर्वोत्तम शिंदे,  डॉ. सुहास घाडगे यांच्यासह आरोग्य कर्मचारी तसेच पारिचारिका श्रीमती छाया खरात, निलम वळवी यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली. या शिबीरामध्ये स्त्री रोग चिकित्सा, अस्थिरोग चिकित्सा, त्वचारोग चिकित्सा, ह्रदय रोग चिकित्सा, हिमोग्लोबिन तपासणी व सामान्य शारिरीक तपासणी करण्यात आली. यावेळी प्रयोगशाळेसह, मोफत औषधी विभाग व नोंदणी विभाग स्थापन करुन तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित महिलांची तपासणी करण्यात आली.

त्वचारोग तपासणीसाठी महिलांची संख्या जास्त
शिबिरात त्वचारोग तपासणीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. यावेळी त्वचारोग तज्ञ डॉ. पद्मांजली अमरसिंह पंडित यांनी महिलांची आरोग्य तपासणी करत त्यांना पुढील मार्गदर्शन करुन आरोग्य विषयक सल्ला दिला.

यावेळी सौ. विजेता विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी हळदीकुंकू घेत संक्रांतीच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. सुहास घाडगे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कु. मोनिका भरतराव खरात, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यकक्षा सौ. मुक्ता मोटे-आर्दड आणि महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांचन परळीकर आणि त्यांच्या सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यकक्ष सौ. मुक्ता मोटे-आर्दड यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्या डॉ. कांचन परळीकर यांनी करून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कु. मोनिका भरतराव खरात यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  

No comments