Breaking News

राष्ट्रवादी विद्यार्थी काॕग्रेंसच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रणव मंगरुळकर

शिरूर कासार : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी शिरुर कासार येथील प्रनव मंगरुळकर यांची नुकतीच जिल्हाअध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर यांनी नियुक्तीपञ देऊन निवड केली आहे. प्रणव मंगरुळकर हे गेल्या कित्येक वर्षापासुन राष्ट्रवादीशी एकनिष्ट राहीले आहेत.त्याचीच पावती म्हणून त्यांना आज सरचिटणीस हे पद मिळाले आहे.आमदार बाळासाहेब आजबे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, रा.वि.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर, प्रदेश सरचिटणीस नेताजी साळुंखे यांच्या सुचनेवरुन हि निवड करण्यात आली आहे. सहा वर्षांपासून विद्यार्थी संघटनेतील कार्यानंतर प्रनव यांना या जबाबदारीवर नेमण्यात आले आहे.

शरद पवारसाहेबांच्या पक्षात कधीच जातीपातीचा विचार न करता पक्षासाठी झटणार्या प्रत्येक कार्यकर्त्याची दखल पक्षाकडून घेतली जाते. माझी जिल्हा सरचिटणीस पदी निवड केल्याबद्दल मी जिल्ह्यातील सर्व नेत्यांचा आभारी आसल्याचे प्रणव मंगरुळकर यांनी निवडीप्रसंगी म्हटले आहे.मंगरुळकर यांच्या निवडीबद्दल शिरुर तालुका पञकार संघासह सर्वस्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments