Breaking News

पुरूष हक्क समितीच्या तालुकाध्यक्षपदी-शरद रेडेकर


आष्टी : पुरूषांवर होणा-यां अन्यायावर कायम वाचा फोडण्याचे काम पुरूष हक्क समिती करत आली आहे.या समितीचे आष्टी तालुका अध्यक्ष म्हणून शरद विठ्ठल रेडेकर यांची नियुक्ती केली आहे.

             गेल्या 25 वर्षापासून कौटूंबीक अन्यायकारक कायद्याविरूध्द काम करणारी पुरूष हक्क सरंक्षण समितीच्या आष्टी तालुका अध्यक्षपदी पञकार शरद रेडेकर यांची नियुक्त जिल्हिध्यक्ष नामदेव साबळे यांनी दिलेल्या नियुक्त पञाद्वारे केली आहे.शरद रेडेकर यांची सामाजिक कार्याची व पञकारितेत गेल्या पंधरा वर्षापासून विविध विषयांवर वाचा फोडण्याचे कामाची दखल घेऊन,या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रेडेकर यांची निवड केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नामदेव साबळे यांनी सांगितले.माझ्या कामाची दखल घेत पुरूष हक्क सरंक्षण समितीचे अध्यक्ष सुनिल घाडगे व सचिव अॅड.धर्मेद्र चव्हाण यांचाया सुचनेवरून तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अॅड.शिवाजी कराळे यांच्या शिफारशीवरून मला या समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.येणा-या काळात आपण प्रामाणिक पणे संघटनेचे काम करत संधीचे सोनं करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शरद रेडेकर यांनी पञकारांना सांगितले.

No comments