Breaking News

जवळा ते चौसाळा रस्ता दर्जाहिनच, अधिकाऱ्यांच्या पाहणीत पडले उघडे !

जवळा ते चौसाळा दर्जाहीन रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारावर कडक कारवाई करावी !

डांबराचा वापर कमी, त्यातही माती, रस्त्यावर सर्वत्र जम्पिंग !

घाटात रस्ता दर्जाहीन करून माणसं मारायची आहेत का? - गुंदेकर, बजगुडे 

बीड :  बीड तालुक्यातील म्हाळसजवळा ते चौसाळा रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सध्या सुरु आहे. हे काम जरुड पासून पुढे चालू आहे. पुढे काम चालू आणि मागे रस्ता हा डांबर अभावी उखडला जात असून रस्त्याची लेव्हलही राखली जात नाही. याबाबत संबंधित कंत्राटदारांना सांगूनही कामाचा दर्जा राखला जात नसल्याने काल जिल्हाधिकारी व अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार केली गेली. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाची पाहणी करून गुत्तेदारांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुंदेकर, ग्रामस्थ म्हणून गणेश एस बजगुडे, विलास काकडे, जालिंदर काकडे, लक्ष्मण बजगुडे, सचिन काकडे, परमेश्वर काकडे, महेंद्र निसर्गन्ध आदींनी केल्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. या पाहणीमध्ये या कामाचा दर्जा राखला जात नसल्याचे स्पष्टपणे अधिकाऱ्यांसमोर उघडे पडले. 

  सदर कामासाठी डांबर हे उच्च दर्जाचे वापरून मुंबई येथूनच खरेदी केल्याच्या कंत्राटदाराच्या पावत्या   तपासूनच पुढील काम सार्वजनिक विभागाने करून घ्यावे. अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुंदेकर व बजगुडे यांनी केली आहे. म्हाळसजवळा ते चौसाळा रस्त्याचे काम दर्जाहीन सुरु आहे. या रस्त्याचे काम चांगले व्हावे यासाठी येथील ग्रामस्थांकडून मागणी सुरु आहे. हा मार्ग श्री क्षेत्र चाकरवाडी येथे जोडणारा आहे. या रस्त्यावर म्हाळसजवळा, नाळवंडी, जरुड, भवानवाडी, कुटेवाडी, बोरफडी, येळंबघाट ते चौसाळा पर्यंतच्या गावांची वाहतूक असणार आहे. 

      यामुळे हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. रस्त्यावर खडी, डांबर नियमानुसार टाकायला हवे होते मात्र तसे संबंधित कंत्राटदाराने केलेले नाही, मध्येच चढ - उतार केल्यामुळे अपघाताचे प्रमाणही भविष्यात वाढू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुलकर्णी यांच्यासमोर सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुंदेकर व गणेश बजगुडे यांनी अतिशय कमी प्रमाणात डांबर वापरल्याचे दाखवून दिले. साफसफाई चांगली न करता डांबरात माती आढळून आल्याने या ठिकाणी अधिकाऱ्यांपुढेच रस्त्याची पोलखोल झाली. याबाबत उपअभियंता शिंदे यांना तात्काळ त्या ठिकाणावरून संपर्क करत धंनजय गुंदेकर यांनी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सदर कामासाठी डांबर हे उच्च दर्जाचे वापरून मुंबई येथूनच खरेदी केल्याच्या कंत्राटदाराच्या पावत्या   तपासूनच पुढील काम सार्वजनिक विभागाने करून घ्यावे.

No comments