Breaking News

म्हाळसापूर जवळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. शितल लहू खांडे तर उपसरपंचपदी श्री. सुमंत राऊत यांची बिनविरोध निवड


म्हाळसापूर जवळा ग्रामपंचायतीवर कुंडलिक खांडे यांचे वर्चस्व ;  कित्येक वर्षांनंतर ग्रामपंचायतीवर फडकला भगवा ..! 

बीड : बीड तालुक्यातील म्हाळसापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शितल लहू खांडे यांची तर उपसरपंचपदी सुमंत राऊत यांची बिनविरोध निवड बुधवारी (दि.१७) रोजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी गावात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करीत आंनदोसत्व साजरा केला. 


राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता असलेल्या म्हाळसापूर ग्रामपंचायतीवर कित्येक वर्षांनंतर प्रथमच शिवसेनेनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बुधवारी सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया पडल्यानंतर सरपंचपदासाठी शिवसेनेच्या एकमेव शितल लहू खांडे यांनी तर उपसरपंच पदासाठी सुमंत राऊत यांनी  अर्ज दाखल केला होता. 

दरम्यान त्यांच्या विरोधात कोणाचा ही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा  विस्तार अधिकारी शेळके व  ग्रामसेवक श्री. साळवे यांनी  सरपंचपदी शितल लहू खांडे यांची तर उपसरपंच पदी सुमंत राजेंद्र राऊत यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.  सविस्तर इतिवृत्तांत वाचून निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी गावात पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून आंनदोत्वस साजरा केला. नवनिर्वाचित सरपंच शितल लहू खांडे व  उपसरपंच सुमंत राजेंद्र राऊत यांचे गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले तर जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments