Breaking News

बीड मधील एका खासगी हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये सापडले अर्भक
आशिष सवाई । बीड  

शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सायंकाळच्या सुमारास टॉयलेट मध्ये पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच त्याठिकाणी पोलिस दाखल झाल्याची माहिती मिळते. 

मिळालेल्या माहितीनुसार जालना रोड वरील एका खासगी हॉस्पिटलच्या टॉयलेट मध्ये एक अर्भक असल्याची माहिती मिळाली. शहर पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर असलेल्या टॉयलेट मध्ये एक अर्भक मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले. हा नेमका काय प्रकार आहे याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. दरम्यान एक महिला सोनोग्राफी साठी हॉस्पिटलमध्ये आली होती. बाथरूममध्ये जावून आल्यानंतर ती थेट घरी गेल्याची माहिती सूत्रांच्या माहितीवरून समजते. हा काय प्रकार आहे, हे पोलिस तपासा नंतर स्पष्ट होईल. 

No comments