Breaking News

मढी गावात बिबट्याचे दर्शन नागरीकांमधे भीतीचे वातावरण


पाथर्डीः
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेञ मढी परीसरात बीबट्याचे दर्शन झाल्याने पुन्हा एकदा नागरीकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दि.(२५) गुरुवारी राञी मढी परीसरात विजय साळवे यांनी बिबट्यास पाहीले असता तात्काळ मढी देवस्थानास याची माहीती दिली मढी देवस्थानाने घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील नागरीकांना खबरदारी घेण्याचे आवहान केले.

 तिसगाव वनपरीक्षेञ अधिकारी व कर्मचारी यांनी मढी येथे येउन बीबट्याचे ठसे पाहीले असता बिबट्या आढळुन असल्याचे सुनिश्चित केले यावर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा बदलण्याची कार्यवाही सुरु केली आहे गतवर्षी नरभक्षक बिबट्याने मढी, केळवंडी, शिरापुर या तीन गावातील श्रेया साळवे, सक्षम आठरे आणि सार्थक बुधवंत या तीन निष्पाप बालकांचा जीव घेतला भगवानगड परिसरातील जंगलातील लमाण तांड्यावरील छबुबाई राठोड या बिबट्याच्या हल्यात जखमी झाल्या होत्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव ,पुणे, जुन्नर येथील वनवविभागाची पथके तैनात करण्यात आली होती शेवटी पाथर्डी तालुक्यातील मढी सिरसाटवाडी शिरापुर या ठिकाणी नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागस यश आले होते.

बिबट्या आढळुन आल्याची सुचना मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेउन बिबट्याचे ठस्याचे निरीक्षण केले असता बिबट्याचा वावर आहे हे लक्षात आले मढी आणि परीसरातील गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत जेथे बिबट्या आढळुन आला आहे तिथं पिंजरा बदलण्याची कार्यवाही सुरु केली आहे. असे वनपरीक्षेञ अधिकारी दादासाहेब वाघुलकर   म्हणाले. 

No comments