Breaking News

बीडकरांचा हैशटैग "नोलॉकडाऊन"


गरिबांच्या जगण्याचे वांदे पोस्टिंग 

#nolockdown च्या फेसबुकवर नोंदवल्या गेल्या २४ हजार पोस्ट !

बीड : लॉकडाऊनमध्ये फावते 2 नंम्बर वाल्यांचे मरण येते गरिबांचे म्हणून "नोलॉकडाऊन" ,कुणाची भीती सरकारच्या मनाला लागली जी अचानक लॉकडाऊनची आठवण झाली?विरोधी पक्ष भाजप मॅनेज आहे का? गोरगरीब लॉकडाऊन मध्ये उपाशी मरतील तरीही त्यांना देणेघेणे नाही?उद्धवा शेतकऱ्यांसाठी एकत्र आलाव मग कामुन शेतकऱ्यांचा मुळावर लॉकडाऊन थोपवताव?आम्ही नियम पाळू, नियमबाह्य बाबी टाळू मात्र तुम्हीदेखील लॉकडाऊन टाळा !सतत गरज नसताना लॉकडाऊन करून व्यावसायिकांचा गळा आवळणे बंद करा.


नुकसानभरपाई देणार असाल तरच लॉकडाऊन करा.जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा जगला तरच देश जगेल त्यामुळे आता परत लॉकडाऊन नकोकुणाची भ्रष्टाचाराची प्रकरणे मागे टाकायचे म्हणून लॉकडाऊनला पुढे आणायचे?नेमकं काय झाकायचं आहे म्हणून लॉकडाऊनला लादायचं आहे? अश्या प्रश्नांचा भडीमार करणाऱ्या पोस्ट बीडकरांनी काल सायंकाळी ७ ते ९ वेळेत पोस्टील्या , सामान्य लोकांचे जगणेच बंद होणार असेल जीवाची भीती कसली असा सवाल उपस्थित करून लॉक डाऊन नाकारणारी मोहीम हजारो युजर ने लाईक केली.

 यामध्ये जवळपास २४ हजार पोस्ट एकट्या फेसबुक साईटवर होत्या. या मोहिमेत धनंजय गुंदेकर, चांगदेव गीते, गोरख शिंघन, बाळू कुडके, मेघा आठवले, नितीन राउत, दत्ता प्रभाले, मुक्तपत्रकार संतोष ढाकणे, अजमेर मणियार, सुफियान मणियार, समीर सरकार, लेखिका शीतल मुळे, रामराजे राउत, विश्वास आखाडे, पत्रकार संजय मालानी, पत्रकार भागवत तावरे, पत्रकार नितीन चव्हाण, घोडके पवन ,पत्रकार गणेश काळे, पत्रकार गणेश तांबे ,जालिंदर काकडे, संभाजी भोसले, शुभम तांदळे, अशोक केकाण, मनोज पाबळे, अशोक येडे, दत्ता जाधव, सय्यद हबीब, अभि वैरागे, रवी मुंडे, श्रीकांत वंजारे, प्रशांत लांडे, दीपक धर्मे, हरी दराडे, महेश गुंदेकर, समीर अत्तर, गणेश बजगुडे, अशोक राऊत, आकाश मस्के, विष्णू डोईफोडे, शेख अरिफ, शादाब शेख, बलभीम राख, रवी लांडे, संतोष डोंगरे, वैभव शिंदे आदींनी या मोहिमेत प्रश्नांची सरबत्ती केली. नियम पाळू मात्र लॉकडाऊन टाळू असा रोख या मोहिमेतून समोर आला . या साठी शेतकरी , लहान व्यापारी उद्योजक आदींच्या मुलांनी हि चळवळ शासन प्रशासन पर्यंत पोहचवली.





No comments