Breaking News

ॲड.गोविंदराव फड यांच्या पुढाकारातून धर्मापुरीची 'आदर्श ग्राम' कडे यशस्वी वाटचाल!


सिमेंट रस्ते, नियमित पाणी पुरवठा, विज, वृक्षारोपण आदीसह विविध योजनांनी गावाची समृद्धीकडे दिशा...

ग्रामपंचायत मार्फत  शेतकऱ्यांना विविध मोफत सुविधा; वैयक्तिक समस्यांची ही सोडवणूक... 

परळी-वैद्यनाथ : श्री क्षेत्र परळी वैजनाथ तालुक्यातील सर्वात मोठे ग्राम असलेल्या आणि ऐतिहासिक किल्ल्यांची पार्श्वभूमी ठरलेल्या श्रीक्षेत्र धर्मापुरी या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सौभाग्यवतींच्या सरपंच पदाच्या माध्यमातून अँड. गोविंदराव फड यांनी विकासाचा घेतलेला ध्यास फलश्रुती कडे वाटचाल करीत असून, विविध ग्रामविकास योजनांच्या माध्यमातून धर्मापुरी मध्ये समृद्धीची नाविन्यपूर्ण यशस्वी वाटचाल दिसून येत आहे.

अंबेजोगाई- अहमदपूर राज्यमार्गावर परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरी हे सर्वात मोठे गाव आहे. विविध जात, धर्म, पंथ यांच्या आणि किल्ल्याच्या माध्यमातून ऐतिहासिक ठरलेल्या धर्मापुरी गावचे महात्म्य स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेंनीही मान्य करून त्यादृष्टीने गावावर प्रेम ठेवले. दरम्यान, गत काही वर्षांमध्ये परळी पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. गोविंदराव फड त्यांच्या सौभाग्यवती धर्मापुरी च्या सरपंच पदी विराजमान झाल्या; आणि विकासाची प्रचंड ध्येयवादी वाटचाल सुरू झाली.

ॲड.गोविंदराव फड यांनी अल्पावधीत धर्मापुरी मध्ये उत्तम दर्जेदार सिमेंट रस्ते, अद्यावत पाण्याची पाईपलाईन आणि प्रत्येक घरासमोर पाण्याचे नळ, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाल्यांची सफाई, स्वच्छता, विविध ठिकाणी उत्तम दर्जेदार वृक्षारोपण, उत्तम ग्रामपंचायत कार्यालय, तेथील रोशनाई आणि एकंदरीतच गावाच्या वैभवात भर घालणाऱ्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून गाव समृद्धीकडे वाटचाल करण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या निधीच्या माध्यमातून ऐतिहासिक धार्मिक पवित्र क्षेत्र ठरलेल्या धर्मापुरी च्या सर्वांगीण विकासाचे आणि आदर्श ग्राम रचनेचे स्वप्न येथील प्राप्त सुविधा पाहून प्रत्यक्षात अवतरल्या ची भावना सर्वसामान्य ग्रामस्थांची झाली आहे,दरम्यान त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असल्याचे ग्रामस्थ तथा युवक अशोक फड यांनी सांगितले.

धर्मापुरी आदर्शग्राम मॉडेल बनवणार!


'परळी तालुक्यातील धर्मापुरी हे मोठ्या लोकसंख्येचे आणि ऐतिहासिक व धार्मिक असे पवित्र ग्राम आहे. दर्जेदार सिमेंट रस्ते,नाल्या, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, वृक्षारोपण, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत ग्रामस्थांना कागदोपत्री सुविधा आदीसह शेतकरी व ग्रामस्थांच्या वैयक्तिक समस्या व सर्वांगीण सुविधांसाठी अहोरात्र कष्ट घेत आहोत; धर्मापुरी हे आदर्श ग्राम बनत असल्याचे समाधान वाटत आहे..!' असे धर्मापुरीचे सरपंच 
सौ.अश्विनी गोविंदराव फड
 म्हणाल्या.

No comments