Breaking News

पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी सुहास सावंत यांची सर्वानुमते निवड

माजलगाव :  भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा उपाध्यक्ष व  दैनिक सूर्योदय या  वर्तमानपत्राचे गेल्या पाच वर्षापासून एक निष्ठेने काम करणारे पत्रकार सुहास सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्षपदी  सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.


 

या निवडीबद्दल पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या आदेशावरून बीड जिल्हा अध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी सर्व आदेश महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक श्री दशरथ रोडे ,राज्य संघटक भागवत वैद्य ,मराठवाडा सचिव एस. पाटेकर यांच्याशी चर्चा करून भागवत वैद्य यांनी बीड जिल्हा अध्यक्षपदी सुहास सावंत यांची घोषणा करून पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी सुहास सावंत यांची निवड  केली.


या निवडीस दसरथ रोडे ,सखा पाटेकर ,भागवत वैद्य यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .सर्व जिल्ह्यांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल पुरोगामी पत्रकार संघ माजलगाव माजी तालुका अध्यक्ष पृथ्वीराज निर्मळ,  माजी शहराध्यक्ष नईम आतार, माजी कार्याध्यक्ष अंगद दराडे,  सदस्य अजीम खतीब, सदस्य राम कटारे, सदस्य अनिस अंसारी यांनी माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments