दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदनचोरी
संतोष स्वामी । दिंद्रुड
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस हद्दीत चोरांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. नाकलगांव शिवारातील एका शेतातील चंदनाचे झाड कापुन चंदनाचा गाभा चोरुन नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.
नाकलगांव येथील पांडुरंग झोडगे यांच्या गट नंबर ३१६ मधील शेतातील एक भलेमोठे चंदनाचे झाड चोरट्यांनी कापले आतील ३० ते ४० हजार रुपयांचा अंदाजे किंमत असलेला चंदनाचा गाभा अज्ञात चोरट्यांनी पळवला असल्याची माहिती शेती मालक पांडुरंग झोडगे यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी दिंद्रुड व परिसरात चंदन तस्करांचा उच्छाद मांडला होता तत्कालीन माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांनी ठिकठिकाणी धाडी टाकत चंदन चोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या दोन वर्षानंतर चंदन चोरांनी परत डोके वर काढायला सुरुवात केली असल्याने शेतकर्यांत भितीचे वातावरण आहे. चंदन तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी दिंद्रुड पोलिसांसमोर डोकेदुखी ठरणार आहे.
No comments