केदारेश्वर गुळास सात राज्यांतून मागणी
परळी वै. : ग्रामीण भागात एखादा उद्योग व्यवसाय सुरू करून त्यात सातत्य टिकवून ठेवत सलग वीस वर्षे हा ऊद्योग व्यवसाया-आधारे आदर्श निर्माण करणे म्हणजे मोठे आव्हानात्मक काम आहे. असे एक आव्हान सलग वीस वर्षांपासून आपल्या गुळ उद्योग व्यवसाय द्वारे ग्रामीण भागातील उद्योगशील शेतकऱ्यांसमोर नंदनजचे माजी सरपंच विठ्ठल अण्णा गुट्टे यांनी एक आदर्श ठेवला आहे.त्यात गत तीन वर्षांपासून या गुळ उद्योगात शुद्ध नैसर्गिक पणा असून यात कोणतेही केमिकल किंवा रसायन चा वापर नसल्याने हा गूळ पूर्णत: आरोग्यदायी आहे.
परळी धर्मापुरी रोडवर नंदनज हे गाव. नंदनज येथे बोरणा प्रकल्प असून या तलावाच्या अगदी पायथ्यालाच नंदनंजचे मा.सरपंच विठ्ठल अण्णा गुट्टे यांची शेती आहे.वीस वर्षांपूर्वी पांगरी येथील वैद्यनाथ कारखाना स्थापन झाल्यानंतर परळी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये ऊस लागवडीची स्पर्धाच सुरू झाली.नंदनच्या विठ्ठल अण्णा गुट्टे यांनीही सर्व शेतकर्यांबरोबर ऊस लागवड केली. परंतु हेवेदावेंच्या राजकारणामुळे व रस्त्यांअभावी कोणताच कारखाना ऊस नेण्यास तयार होईना.परंतु गुट्टे कुटुंब यामुळे हतबल झाले नाहीत.त्यांनी यातूनही मार्ग काढत गुळ उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि हा गुळ उद्योग लगातर वीस वर्ष अगदी सुरळीतपणे चालत असून एक आदर्शच या गुळ उद्योग व्यवसाय द्वारे कुटुंबीयांनी उद्योगशील शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे. या व्यवसायात गत तीन वर्षांपासून शुद्ध नैसर्गिकपणा असून कोणतेही केमिकल यात वापरले जात नाही.
त्यामुळे हा गुळ पूर्णतः आरोग्यदायी आहे आणि म्हणूनच आज गुट्टे कुटुंबीयांच्या केदारेश्वर गुळ व गुळाचे ईतर उत्पादित पदार्थ जसे गुळ डाग, गुळ पावडर,काकवी,गुळ तुप वडी, गुळ बाजरी,इत्यादी केदारेश्वर गुळ उत्पादी पदार्थांना महाराष्ट्रासह सात राज्यांतून मागणी आहे.केदारेश्वर गुळात पूर्ण शुद्ध नैसर्गिकपणा असल्याने भाव सुद्धा चांगला मिळत असून प्रति टन ऊसाला कमाल २२ हजार रुपये भाव मिळतो.यात कोणतेही केमिकल नसल्याने खर्चही कमी येतो.फक्त ऊस गाळप प्रक्रिया खर्च येतो.सध्या खुल्या बाजारात साखरेचे दर चांगले असले तरी साखर दर मानाने उसाला भाव कोणताच साखर कारखानदार देताना दिसत नाही.मात्र शुद्ध नैसर्गिक गुळ उत्पादनामध्ये उसाला प्रति दीड टना मागे कमाल भाव २२ हजार रुपये इतका मिळत असल्याने,यात गाळप प्रक्रिया मजुरी व इतर वगळता दहा हजार ते अकरा हजार रुपये प्रति टन दर उसाला मिळतो.
No comments