Breaking News

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता


गौतम बचुटे । केज 

घरातून मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन वॉकला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावातील दोन सख्ख्या बहिणी या दि.१२ फेब्रुवारी रोजी आम्ही मॉर्निंग वॉकला जात आहोत; असे सांगून घरातून निघून गेल्या आहेत. त्या पैकी एकीचे वय २१ वर्ष तर दुसरीचे १८ वर्ष आहे. त्या लवकर घरी परत न आल्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी नातेवाईक व इतरांकडे चौकशी केली परंतु त्या मिळून आल्या नाहीत किंवा त्यांचा तपास लागला नाही. मोठ्या मुलीची उंची ५ फूट ६ इंच असून रंग गोरा, मध्यम बांधा, अंगात पांढऱ्या रंगाचा नाईट ड्रेस व पायात रनिंग शूज तर लहान मुलीची उंची ४ फूट ६ इंच, रंग गोरा, मध्यम बांधा, अंगात लाल रंगाचा नाईट ड्रेस व पायात रनिग शूज या मुली बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या वडिलांनी केज पोलीस स्टेशनला दिली आहे. बेपत्ता क्र. ६/२०२१ नुसार दोघी बहीणीच्या बेपत्ता प्रकरणी नोंद घेऊन पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत. या दोघी बहिणी कुणाला आढळून आल्या किंवा त्यांच्या बाबत काही माहिती मिळाली तर नजिकच्या पोलीस स्टेशनला किंवा केज पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments