Breaking News

रेवकी-देवकी गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामास सुरुवात विजयसिंह पंडित यांच्या हस्ते शुभारंभ ; सभापती सविता बाळासाहेब मस्के यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध

गेवराई :  तालुक्यातील रेवकी व देवकी या दोन्ही गावांच्या मधून जाणाऱ्या नदीवरील पुलाच्या कामाचा शुभारंभ शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला असून या पुलाच्या कामास सुरुवात झाली आहे. दरम्यान दोन्ही गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा तसेच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या या पुलाच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी राष्ट्रवादीचे मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत सातत्याने पाठपुरावा करून ४९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. 

       गेवराई तालुक्यातील रेवकी व देवकी या दोन्ही गावाच्या मधून नदी गेलेली आहे. नदी मोठी असल्याने व पाणी सतत वाहत असल्याने दोन्ही गावातील नागरिकांना मोठा वळसा मारुन दळणवळण करावे लागत होते. पावसाळ्यात तर येथील नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता. याबाबत येथील नागरिकांनी या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के यांच्याकडे हा पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह धरला होता. दरम्यान नागरिकांच्या या मागणीची दखल घेत सभापती सविताताई मस्के यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत या पुलाच्या मंजुरीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. रेवकी व देवकी या गावांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी जिल्हा परिषदेच्या बैठकी दरम्यान लावून धरला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन कामाला मंजूरी मिळाली, शिवाय यासाठी तब्बल ४९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दरम्यान शनिवार दि.13 रोजी सकाळी या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सभापती सविताताई मस्के, बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के, संतराम चोरमले, कचरू बाबरे, भाऊसाहेब नरोवटे, भाऊसाहेब सौदरकर, गजानन खताळ, बाळराजे चोरमले, निळकंठ चोरमले, शरद चोरमले यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

पायपीट थांबणार, गावात बस जाण्यासाठी सोईस्कर

  दोन्ही गावाच्या मध्ये नदी असल्याने दुचाकी, चारचाकी वाहने जात नसल्याने नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते. दरम्यान या पुलाच्या कामामुळे हि पायपीट थांबणार आहे, शिवाय गेवराई येथून गोंदी ला जाणारी बस देवकी-रेवकी गावातून जाऊन नागरिकांच्या प्रवासाचा ही प्रश्न सुटणार आहे. दरम्यान नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या या पुलाचे बांधकाम करण्याचा संकल्प पूर्ण झाला असल्याचे सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी सांगितले.

No comments