Breaking News

उसामध्ये हरभरा अंतरपीक प्रात्याक्षिकचा प्रयोग - अल्पभूधारक शेतकऱ्याचा उपक्रम


माजलगाव : शिवारातील अनिरुथ जवंदळे यांनी कृषी विभागाच्या मदतीने आपल्या शेतात उसात हरभरा हे पीक प्रत्येक्षिक राबविले.
अनिरुथ जवंदळे यांच्या नावे जेमतेम 1 हेक्टर जमीन असून, त्यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतात केळीचे पीक घेतले होते पण त्यावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे, त्यांचा केलेला खर्च पण निघाला नाही. जमिनीत काहीतरी कमतरता असल्यामुळे उत्पन्न निघत नसेल असे समजून त्यांनी तालुका कृषी अधिकारी माजलगाव कार्यालयातील कृषी सहाय्य्क देशमुख यांच्याशी संपर्क केला. जमीन आरोग्य पत्रिकेतील अन्न द्रव्य कमतरते नुसार देशमुख यांनी त्यांना मार्गदर्शन केले व कमतरता असलेले सूक्ष्म अन्न द्रव्य यांचा वापर करण्यास सांगितले.

सन 2020-21 राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत उसात हरभरा अंतरपीक प्रत्येक्षिक देऊन त्यातील सर्व बाबी योग्य रित्या राबवून घेतल्या. आज अनिरुथ जावंदळे हे आपल्या शेतातील पीक परिस्थिती पाहून खूप समाधानी आहेत. पिकाची वाढ खूप चांगल्या व जोमदार झालेली आहे. सदरील कामात श्री वाघमोडे मंडळ कृषी अधिकारी व श्री खेडकर कृषी पर्यवेक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

No comments