Breaking News

तहसीलदारांच्या सांगण्यावरून मंडळधिकारी पुराणिक यांनी केला खोटा अहवाल दाखल--बाळासाहेब आडागळे

 


मौजे लवुळ येथील भ्रष्ट तलाठ्यांना माजलगाव तहसीलदारांचा अभय

माजलगाव  : माजलगाव तालुक्यातील मौजे लवूळ येथील २०१७ ते २०२० पर्यंतच्या कार्य कालामध्ये लाचखोर भ्रष्ट तीन तलाठ्यांनी मौजे लवुळ येथील गावकऱ्यांकडून आर्थिक व्यवहार. करून. बड्याबड्या शेतकऱ्यांना इतर लाभासाठी व शौचालयासाठी भूमिहीन प्रमाणपत्र दिले असून या संदर्भामध्ये त्यांची चौकशी व निलंबन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई गट ) सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग बीड नईम आतार यांनी वेळोवेळी या प्रकरणाचा पाठपुरावा करत मा.जिल्हाधिकार्यालय बीड, मा.विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, तसेच मा. तहसीलदार माजलगाव यांना निवेदने देऊन उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.

त्यावर मा. विभागीय आयुक्त साहेब औरंगाबाद डॉ. शे.प्र. सावरगावकर सहाय्यक आयुक्त( महसूल )विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याचे पत्र दि. २५ /०१/२०२१ रोजी  संबंधितांना पाठवले होते. पण याप्रकरणी माजलगावचे तहसीलदार यांनी मौजे लवूळ येथील प्रकरणातील भ्रष्ट तलाठी वाघमारे,तलाठी भट्टे, तलाठी डाकेवार यांनी आर्थिक व्यवहार करून तहसीलदार यांच्या सांगण्यावरून मंडळाधिकारी पुराणिक यांनी शासनाची फसवणूक करत खोटा अहवाल दाखल करून. तलाठ्यांना अभय दिल्याप्रकरणी तीन भ्रष्ट लाचखोर तलाठ्यासह लाचखोर व भ्रष्ट मंडळाधिकारी पुराणिक व  तहसीलदार यांचे चालू वेतन बंद करून. त्यांच्यावर कठोर निलंबनाची कार्यवाही करून त्यांच्यावर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी परत एकदा दि.२५/०१/२०२१ रोजी विभागीय मा. आयुक्त साहेब औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असून. माजलगाव तालुक्यातील मौजे लवूळ प्रकरणी ३ तलाठी व मंडळाधिकारी पुराणिक यांनी खोटा अहवाल सादर करून संगनमताने आर्थिक व्यवहार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या वर वारंवार तक्रारी करून ही आर्थिक व्यवहारातून ही कर्मचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या. व कार्यवाहीस दिरंगाई करणाऱ्या व माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व अशा बऱ्याच शे प्रकरण धडपडणाऱ्या व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या तहसीलदारा सह गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने असंख्य कार्यकर्त्यांसह येत्या दहा दिवसांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( गवई गट ) यांच्या वतीने जोपर्यंत  या  भ्रष्ट तलाठ्यावर आणि तहसीलदार व मंडळाधिकारी यांच्यावरती कार्यवाही होत नाही. तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा दि.०९/०२/२०२१ रोजी दिलेल्या निवेदनात देण्यात आलेला आहे. 

व त्यात काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्यावर राहील असे निवेदनकर्त्याने निवेदनात म्हटले असून. त्यांनी मा. आयुक्त साहेबांना दिल्या गेलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने संबंधित अधिकारी कर्मचारी हे या प्रकरणी मला दुसऱ्या जवळ धमकावत आहेत. त्यांच्यापासून माझ्या जीवितास धोका नाकारता येत नाही. व त्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांची जबाबदारी राहील अशा आशयाचे निवेदन दि.०९/०२/२०२१  रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई गट ) सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग बीड नईम आतार यांनी दिले आहे.

No comments