Breaking News

समाजिक व राष्ट्र उन्नतीसाठी बाबासाहेबांनी लेखणी झिजविली -- आर.एस.यादव

माजलगाव : बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक या पाक्षिकचे माध्यमांतून आपली लेखणी जे जे येते त्यासाठी नाही घालविली तर जे जे समाजाच्या हितासाठी व राष्ट्रहिताच्या गरजेचे आहे त्यासाठी आपली लेखणी झिजवली असे प्रतिपादन आर.एस.यादव यांनी दि. 31 जानेवारी रोजी मूकनायक दिनाच्या आयोजित सोहळ्यात केले.

येथील शिवाजी चौकात विविध सामाजिक संघटना एकत्रित येऊन मुकनायक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख वक्ते आर.एस.यादव हे होते.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जाधव सर यांनी केले प्रस्तावित जकी बाबा तर सचिन उजगरे व राजेश घोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


या सोहळ्यात बहुजन क्रांती मोर्चा,वंचित बहुजन आघाडी,लढा मानवमुक्तीचा,मानवी हक्क अभियान,जमाते इस्लामी हिंद,राष्ट्रीय चर्मकार संघ,मल्हार सेना, संभाजी ब्रिगेड,ऑल इंडिया पॅंथर सेना,यासह आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात मूकनायक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमास सचिन उजगरे,राजेश धोंडे,नानासाहेब घोडके,जकी बाबा,मुजम्मिल पटेल,विलास नेमाने सोनाजी घडीसे,अंकुश जाधव,श्याम वाघमारे, काशीनाथ साळवे,अशोक तांगडे,डॉ.संजय नाकलगावकर,दीपक भालेराव,धम्मानंद बोराडे पांडुरंग जाधव यासह आधी संघटना प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमास बहुजन समाजातील कर्मचारी कार्यकर्ते तरुण व बुद्धिजीवी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.रतन लांडगे,नवनाथ कांबळे सुभाष गवई,निंबाजी सोनपसारे,सहजराव आदींनी परिश्रम घेतले.तर आभार प्रा.धम्मानंद बोराडे यांनी  मानले.

No comments