Breaking News

डाॅ. रमेश भराटे यांना डाॅक्टरेट पदवी देवुन सन्मानित करण्यात येणार


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील प्रसिद्ध ह्रदय रोग व छाती विकार तज्ञ डाॅ. रमेश भराटे यांना त्यांच्या वैद्यकिय क्षेत्रातील योगदाना बद्दल जागतिक मानवाधिकार संघटने कडून त्यांच्या चैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल मानाची मानद डाॅक्टरेट ही पदवी देवुन मा. ऊपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी ईंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे मानपत्र व प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात येणार आहे.


डाॅ. रमेश भराटे केज तालुक्यातील मोटेगाव या अगदी छोट्याशा गावातील आहेत. डॉ. भराटे हे सध्या लातुर आणि मराठवाड्यातील प्रसिद्ध छाती व श्वसन विकार तज्ञ म्हणून नामांकित डाॅक्टर आहेत. त्यांनी आता पर्यंत हजारो रुग्णांना जीवदान दिले आहे. ते सध्या गायत्री हाॅसपीटल लातुर तसेच शासकीय वैद्यकिय महाविदयालय लातुर येथे कार्यरत आहेत. या पूर्वी त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी सेवा दिलेली आहे. सध्या ते गायत्री हाॅसपीटल लातुर येथे मागील २० वर्षापासुन गोरगरीब व सर्वसामान्य रुग्ण याची सेवा करत आहेत.

लातुर येथे वैद्यकिय क्षेत्रामध्ये डाॅक्टरेट ही पदवी मिळवणारे बहुधा ते पहिलेच डाॅक्टर असुन त्यांनी आय एम ए, इंडियन चेस्ट सोसायटी, नॅशनल टी बी असोशियशन इत्यादी संघटना सोबत कार्य  केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी विविध विषयावर व्याख्यान व मार्गदर्शन केले आहे. वैद्यकिय क्षेत्र सांभाळून सामाजिक बांधिलकी जपणारे, गोरगरीब, सर्व जनते मध्ये मिसळून वावणारे व्यक्तिमतत्व म्हणुन त्यांची लातुर मध्ये ओळख आहे. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये वैद्यकीय व पदव्युत्तर पदवी घेवुन लातुर मध्ये सेवा देत आहेत. जागतिक आरोग्य संघटना, युनायटेड नेशन, यु एस एफ डी ए सारख्या नामांकित संघटनेसी संलग्न अशा संघटनेकडुन गौरव व प्रतिनिधीत्व मिळणे ही एक दुर्लभ संधी असुन डाॅ. भराटे यांना ही संधी मिळाल्यामुळे  वैद्यकिय क्षेत्रात मराठवाड्याची मान ऊंचावली आहे. त्यांच्या या बहुमाना बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


No comments