Breaking News

स्वराष्ट्र मित्रमंडळाच्या वतिने पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा सत्कार

माजलगाव :   येथील स्वराष्ट मित्रमंडळाच्या वतीने पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा स्वराष्ट मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा नेते ज्ञानेश्वर नाना मेंढके यांच्या हस्ते दि ०१ फेब्रुवारी सोमवार रोजी सत्कार स्वराष्ट मित्रमंडळाच्या कार्यालयात करण्यात आला.

स्वराष्ट मित्रमंडळाच्या वतीने पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा  सत्कार दि ०१ फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी १२:३० वाजता करण्यात आला.


यामध्ये माजलगाव पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार तुकाराम बापु येवले,केज पत्रकार संघाचा निर्भिड पत्रकारिता पुरस्कार उमेशकुमार जेथलीया यांना मिळाल्यामुळे तर उदगीर पत्रकार संघाचा उत्कृष्ट वर्ता पुरस्कार ज्योतिराम पाढंरपोटे यांना जाहिर झाल्यामुळें येथील स्वराष्ट मित्रमंडळाच्या शिवाजी चौक येथील कार्यालयात स्वराष्ट मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा नेते ज्ञानेश्वर नाना मेंढके यांनी केला,तसेच याच कार्यक्रमात लाँकडाऊन मध्ये अन्नदान करणारे शाम देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला, यावेळी भाजपाचे बबनराव सिरसट,भाजपाचे तालुका उपध्याक्ष तथा ढोरगावचे सरपंच ज्ञानेश्वर सरवदे,जेष्ठ पत्रकार संतोष जेथलीया, पत्रकार भास्कर गिरी,पत्रकार वाजेद पठाण,पत्रकार बाळासाहेब आडागळे,बाळासाहेब गायकवाड, बबनराव सुरवसे,श्रीकांत गायकवाड, राजेश मिटकरी,श्रीपती धिरडे,अमोल मुळे,वैजनाथ चव्हाण, किशोर श्रीश्रीमाळ,नारायण मेंढके यांची उपस्थिती होतो.
No comments