Breaking News

शिरुर शहरात प्रभू भगवान विश्वकर्मा जयंती साजरी

रायमोहा : सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रभू भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.बाजारतळ येथे सकाळी दहा वाजता प्रभू भगवान विश्वकर्मांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आली.

या वेळी सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा संपर्कप्रमुख ह.भ.अर्जुन महाराज उगले यांनी प्रभू भगवान विश्वकर्मा यांच्या जीवनावर आपले विचार मांडले.सृष्टीचे निर्माता भगवान विश्वकर्मा असून आधुनिक काळात त्यांचे काम अभियंता आणि कारागीर करत असल्याचे स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी आपल्या प्रवचनातुन सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जयंती कार्यक्रम पार पडला.या वेळी उत्सव समितीचे नगरसेवक ज्ञानेश्वर उटे,काशिनाथ पवार,नगराध्यक्ष दत्ता पाटील गाडेकर, साप्ताहिक संघर्षयोध्दाचे संपादक गोकुळ सानप,बाळू उटे,रामराव राऊत,अशोक लाड,बाळू राऊत,गणेश नगरकर,सतिश नगरकर,संतोष मोरे,पवन कळसे,अनिल जगताप यांच्यासह महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments