Breaking News

हक्कान सांगा, गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -आ.संदिप क्षीरसागर

सहा ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच

बीड :- स्व.काकू-नानांनी राजकारणापेक्षा नेहमीच समाजकारणाला अधिक महत्त्व दिले आहे, ग्रामीण भागातील सामान्य माणसाची कामे झाली पाहिजेत, गावात शासनाच्या विविध योजना पं.स., जि.प.च्या माध्यमातून पोहचल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशिल रहा, हक्कान सांगा, गावच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे.
पंधरा ग्राम पंचायत निवडीत सहा ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच, उसरपंच झाल्यानंतर त्यांचा सत्कार करतांना आ.संदिप क्षीरसागर बोलत होते. निवडणुका झाल्या आता गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहा, हक्कान सांगा जि.प., पं.स.च्या माध्यमातुन गावात योजना राबवा, निधी कमी पडु देणार असे ते म्हणाले. पंधरा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम बुधत्तारी पार पडला. यामध्ये आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सहा ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच झाले आहेत. यामध्ये पिंपळगाव मंझरा सरपंच संजीवनी काशीनाथ खांडे, उपसरपंच राजेंद्र खांडे, कदमवाडी सरपंच प्रिती राहुल कदम, उपसरपंच मंदा महादेव कदम, पिंपळगाव मोची सरपंच बाबुराव उमाजी कोरडे, उपसरपंच सौ.क्रांती महादेव कदम, आनदंवाडी सरपंचपदी मोहन देवकते, उपसरपंच सखुबाई सखाराम खरसाडे, भंडारवाडी सरपंचपदी लालासाहेब भास्करराव सालगुडे, उपसरपंच पदी विकास आप्पाराव जाधव, गुंधावाडी ग्रा.पं. यांचा समावेश आहे. 

No comments