Breaking News

आम आदमी पार्टीचे शहर स्वच्छतेचे गांधीगिरी अभियान नगरपरिषदेच्या उंबरठ्यावर


नगरपरिषद कार्यालयाच अस्वच्छ आहे तर मग शहराची दुर्दशा यावरूनच स्पष्ट होतेय - जिल्हाध्यक्ष अशोक येडे 

बीड :  बीड शहरात नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. नगरपरिषद स्वच्छतेचा नुसता देखावा करत असल्यामुळे आम आदमी पक्षाकडून गेल्या काही आठवड्यांपासून स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

    आम आदमी पक्षाकडून सलग 7 व्या रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून रविवार दि 14 फेब्रुवारी रोजी आपचे हे नगरपरिषदेचा नाकर्तेपणा समोर आणणारे गांधीगिरी अभियान थेट नगरपरिषद कार्यलयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. कॅन्सर दिनाच्या औचित्यावर धूम्रपान करून थुंकण्याने लालसर झालेले नगरपरिषद कार्यालय व परिसर आज आपकडून स्वच्छ करण्यात आले आहे.

      जर नगरपरिषद कार्यालय अस्वच्छ असेल तर शहर कसे आहे हे यावरूनच शहरातील नागरिकांनी जाणून घेतले आहे. नगरपरिषदेचा कारभार हा दिव्याखाली अंधार असल्यासारखा असून स्वच्छतेच्या बाबतीत नुसता देखावा सुरू असल्याचे आप जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी म्हंटले आहे. 

    या स्वच्छता अभियानावेळी भिंतींना स्वच्छ करण्यासह नगरपरिषद आवारातील स्वच्छता देखील आम आदमी पक्षाकडून करण्यात आलेली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, संघटन मंत्री ज्ञानेश्वर राऊत, शहराध्यक्ष सय्यद सादेक, शेरकर, गांडगेसह आम आदमीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





No comments