Breaking News

केज शहरात पार्किंग अभावी वाहतुकीची कोंडी: पार्किंग व्यवस्थेसाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची पोलिस ठाण्यात बैठक

गौतम बचुटे । केज  

केज शहरातील मंगळवार पेठ, कानडी रोड, सोनार गल्ली व टेलर गल्ली येथील पार्किंग अभावी वाहतुकीची सतत कोंडी होऊ लागल्याने नागरिकांसह व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी केज पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या उपस्थितीत मंगळवारी व्यापाऱ्यांनाची बैठक घेण्यात आली.

केज येथील मंगळवार पेठ, कानडी रोड आणि सोनार गल्ली व टेलर गल्ली येथील वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ती समस्या सोडविण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी केज शहरातील सर्व व्यापाऱ्यांनाची एक बैठक बोलावून बैठकीत या भागात औरंगाबाद विभागाचे पोलीस महासंचालक प्रसन्ना आणि जिल्हा पोलीस आर. राजास्वामी यांच्या आदेशा नुसार सम आणि विषम तारखेला राबविण्यात येणाऱ्या पार्किंग व्यवस्था, आणि व्यापाऱ्यांनाच्या समस्या तसेच इतर अडीअडचणी संदर्भात माहिती जाणून घेतली व चर्चा केली. 

या बैठकीला महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी,  केज तहसीलचे अव्वल कारकून पठाण, धुमक, तारळकर, इंदुलकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले, प्रवीण देशपांडे, विकास मिरगणे, डॉ. शेटे, सचिन लोहिया, चिद्रवार, नंदकिशोर मेटे, निरंजन लोकरे, लक्ष्मीकांत चाटे, होस्टे यांच्यासह पत्रकार संतोष गालफाडे आणि गौतम बचुटे, वाहतूक शाखेचे जिवन करवंदे, हनुमंत चादर हे उपस्थित होते.  या पी-वन पी-टू प्रकारच्या पार्किंग व्यवस्थे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविल्या नंतर जिल्हाधिकारी साहेब यांना अहवाल पाठविण्यात येईल. त्या नंतर जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढल्या नंतर अंमलबजावणी करण्यात येईल. असे केज पोलिसी ठाण्याचे पोनि. प्रदीप त्रिभुवन म्हणाले. 

  

No comments