Breaking News

दलित समाजातील शेतकर्‍याला दिला धीर; रिपाइंचे राजू जोगदंड यांनी शेतकर्‍याला ज्यूस पाजून सोडवले उपोषण

प्रशासनाने दिली त्या शेतकर्‍याला 12 मार्चची तारीख 

जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आरपीआय तुमच्या पाठिशी


बातमीचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

बीड : उपजिल्हाधिकारी भूसुधार यांच्या मनमानीला कंटाळून बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील दलित समाजातील शेतकरी दगडू निकाळजे आपल्या मुलासह गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते. या उपोषणाला आरपीआयचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी पाठिंबा दिल्याने प्रशासन याची गांभीर्याने दखल घेतली. हे प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्यात येईल असे आश्वासन देवून 12 मार्चची तारीख दिली. दरम्यान जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुमच्या पाठिशी असा धीर देत रिपाइंचे राजू जोगदंड यांनी शेतकरी दगडू निकाळजे यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले.बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील सर्वे नंबर 169 व 170 मधील शेत जमिनीवर दलित समाजातील दगडू निकाळजे व इतरांचे कुळ कायद्यानुसार मालकी हक्क आहे. हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1950 च्या  कलम 92 मधील कायद्यात तरतूद नसतानाही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील यांनी कुळन्यायाधीश तथा तहसीलदार यांच्या दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजीच्या आदेशास अस्तित्वात नसलेल्या कायद्याच्या अपिलात एक वर्षापूर्वी म्हणजे 3 जानेवारी 2019 स्थगिती आदेश दिला होता. स्थगिती आदेश रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी सोमवारी (दि.15) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी पाठिंबा दिला होता. तसेच या उपोषणाची दखल जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी गांभीर्याने घ्यावी, नसता जिल्हा प्रशासनाच्या विरोधात रिपाइंच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून हे प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्यात येईल असे लेखी पत्र देवून 12 मार्चची तारीख दिली. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र उपोषणकर्ते निकाळजे यांनी पुढील तारीख न देता उप जिल्हाधिकारी भुसूधार यांनी दिलेला स्थगिती आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजू जोगदंड यांनी मध्यस्ती करुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी आपल्या प्रकरणात लक्ष देत असून तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आरपीआय तुमच्या खंबीरपणे पाठिशी आहे. असा विश्वास देत देवून रिपाइंचे राजू जोगदंड यांनी शेतकरी दगडू निकाळजे यांना धीर दिला. त्यांच्यासह त्यांच्या मुलाला ज्यूस पाजून त्यांनी उपोषण सोडवले.  प्रश्न निकाली न लागल्यास रिपाइं करणार आंदोलन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे हे पिडीत व्यक्तीला न्याय मिळवून देई पर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. प्रशासनालाही आपल्या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असे राजू जोगदंड म्हणाले.

No comments