Breaking News

समाज संघटीत करायचा असेल तर;संत सेवालाल महाराजांची जयंती १५ फेब्रुवारीलाच साजरी करावी - भाऊराजे चव्हाण

माजलगाव :  गोर बंजारा समाजाचे संत म्हणुन ओळखले जाणारे सतगुरू श्री संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला.म्हणून आपण दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करतो.समाज संघटित करण्यासाठी व समाज सेवा करण्यासाठी गोर बंजारा समाजामधे खूप काही संघटना तयार झाल्या आहेत.आणि त्या संघटनाही खुपच छान काम करत आहेत, मात्र काही दिनदर्शिका  १५ फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज जयंतीचा उल्लेख न केल्याने समस्त गोर बंजारा समाजाने व  समाजातील काही संघटनेने जाहीर निषेध दाखवला होता.हे अगदी योग्यच आहे पण त्यांनाही आपण दाखवून देऊ की गोर बंजारा समाजाचे संत सतगुरू श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती आपण किती उत्साहाने साजरा करतो.

हे कधी कळेल जेव्हा आपल्या सर्व संघटना एकत्र गोर बंजारा समाजातील काही संघटना आपल्या प्रसिद्धीसाठी व आपल्या फायद्यासाठी फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळ्या तारखेला जयंती साजरी करतात. जयंती करण्यामागे आपला कोणताही फायदा न पाहता गोर बंजारा समाज जर संघटित करायचे असेल तर आपल्याला संत सेवालाल महाराज यांची जयंती ही १५ फेब्रुवारीलाच सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावी असे आवाहन  भाऊराजे चव्हाण व गोर बंजारा बिग्रेड च्या वतीने विनंती केली आहे.व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  श्री संत सेवालाल महाराजांची जंयती सर्वांनी उत्सफुर्तपणे साजरी करावी असे ही आहवान यावेळी भाऊराजे चव्हाण यांनी समाज बांधवांना केले आहे.


No comments