Breaking News

केज पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू संदर्भात कार्यशाळा

गौतम बचुटे । केज 

केज येथे आकस्मिक व अपघाती मृत्यू प्रकरणी केज  पोलीस स्टेशन येथे तपासी अधिकारी व तपासी अंमलदार यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न झाली.

दि २२ फेब्रुवारी सोमवार रोजी केज येथे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली आकस्मिक व अपघाती मृत्यू या बाबत तपासी अधिकारी व अंमलदार यांचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी आकस्मिक मृत्यू संदर्भात प्रेताचे सूक्ष्म निरीक्षण, शरीरावर आढळणाऱ्या जखमा, इतर पुरावे तसेच परिसर आणि त्याची माहिती याचा उल्लेख घटनास्थळ पंचनामा व चौकशी अहवालात नमूद करून प्रथम खबरी अहवालात याचा सर्व समावेश करण्यात यावा. तसेच अपघाती आणि नैसर्गिक मृत्यू प्रकरणी होणारे मृत्यू याचा तपास करीत असताना आढळणाऱ्या त्रुटी कमी करणे. तपास कसा करावा; या बाबत शास्त्रीय आणि वैद्यकीय बाबींची माहिती दिली. या प्रशिक्षण शिबिराला सर्व तपासी अंमलदार उपस्थित होते.

No comments