Breaking News

शेतमजूर महिलेचा विनयभंग


गौतम बचुटे । केज  
केज तालुक्यात शेतात काम करीत असलेल्या एका २१ वर्षीय शेतमजूर
महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

केज तालुक्यातील एका गावात सोमवारी  (दि.२२) सायं. ४:३० वाजण्याच्या सुमारास २१ वर्षीय महिला शेतात  हरबरा काढीत असताना राजेंद्र पंडीत कोठुळे याने तिचा विनयभंग केला. पीडित महिलेच्या तक्रारी नुसार आरोपी राजेंद्र कोठुळे याच्या विरुद्ध गु. र. नं. ७६/२०२० भा. दं. वि.३५४, ३५४(अ) व ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.No comments