Breaking News

गुंगीचे औषध देऊन वृद्धास लुबाडले : पोलीसात गुन्हा दाखल

पोलीस आरोपीच्या मागावर

गौतम बचुटे । केज 

मुलीचे लग्न जमविण्यासाठी सोबत चला. असे म्हणून गुंगीचे औषधी देऊन एका वृद्धाच्या हातातील अंगठी व रोख दहा हजार रु. लुटल्या प्रकरणी सराईत ठकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की,  दि. ९ फेब्रुवारी मंगळवार रोजी तांबवा येथील मारूतीराव कराड वय ७० वर्ष हे शेवग्याच्या शेंगा व कांदे विकण्यासाठी केज येथील मंगळवारचा आठवडी बाजारला आले होते. त्यांनी आपला माल विकून घरी भाजीपाला घेण्यासाठी बाजार करीत असतांना एकजण त्यांच्या जवळ आला. त्याने ओळख असल्याचे सांगून तो बंडू उर्फ माणिक सिरसट रा. आरणगांव येथील आहे. असे म्हणुन चहाच्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी घेऊन गेला. दोघांनी मंगळवार पेठ मधील शिवराणा हॉटेलमध्ये चहा घेतला. नंतर तो मारुती कराड यांना म्हणाला की येथून जवळच असलेल्या गुंड वस्तीवर त्याच्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी जायचे आहे. तेथे ओळखीचे कुणी नाही; तुम्ही वयस्कर आहात म्हणून सोबत चला. असे म्हणाला. ते दोघे वस्तीकडे पायी चालत निघाले. बंडू उर्फ माणिक म्हणाला की, ऊन जास्त आहे. असे म्हणून ते दोघे जुन्या साळेगांव रस्त्याच्या बाजूला बोरीच्या झाडा खाली थांबले. तेव्हा बंडू उर्फ माणिक याने मारुती कराड यांना वृद्धास मला म्हणाला तुम्ही बिस्कीट खा. असे म्हणुन बिस्कीट ख्याण्यास दिले आणि त्याच्या खिशातील थम्सअपची बाटल काढुन पिण्यास दिली. 

मारुती कराड यांना थम्स अप पिल्या नंतर गुंगी आली. त्या वेळेत बंडू उर्फ माणिक सिरसट याने मारुती कराड यांच्या हातातील सोन्याची ७ ग्रॅम वजनाची अंगठी ज्याची किंमत २१ हजार रु. असलेेली आणि खिशात ठेवलेले नगदी १० हजार रु. असा एकूण ३१ हजार रु. चा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. थोड्या वेळाने मारुती कराड यांना शुद्ध आली तेव्हा त्यांना आपण लुटले गेल्याचे लक्षात आले. त्या नंतर त्यांनी दवाखान्यात उपचार घेतल्या नंतर दि. १० फेब्रुवारी रोजी केज पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दिली. त्या नुसार केज पोलीस स्टेशनला बंडू उर्फ माणिक सिरसट रा आरणगाव या ठकाच्या विरुद्ध गु र नं ६६/२०२१भा. दं. वि. ३२८ आणि ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे आणि अमोल जाधव हे करीत आहेत.

तपासी पोलिस अधिकारी
पोउपनि. श्रीराम काळे


या गुन्ह्यातील आरोपी हा सराईत पद्धतीचा गुन्हेगार असून त्याने अशा प्रकारे परिसरात अनेकांना ठकविले आहे. तसेच त्याला शिक्षा देखील झाली असल्याची माहिती आहे.
Zzzzzzzzzzzzzz

No comments