Breaking News

शेतकऱ्यांचे पीक पाण्याअभावी जळत असताना,सरकार गप्पा का?:-राजेंद्र आमटे


शेतकरीचे कैवारी म्हणून मिरवणारे नेते,आत्ता शांत कसे?

बीड :  आज महावितरण च्या व दळभद्री सरकारच्या तुघलकी आदेशामुळे शेतात उभी असणारी पीक वीज पुरवठा तोडल्या मुळे जळू लागली आहेत शेतकऱ्याचे कैवारी म्हणून घेणारे सरकार गप्प का?

निवडणूक आल्या की बीड जिल्ह्यात अनेक नेते स्वीय घोषित नेते शेतकरी पुत्र म्हणून मिरवतात. निवडणुकीत मी शेतकरी पुत्र ,मी शेतकऱ्यांनचा तारणहार ,आम्ही शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मताचा जोगवा माघात फिरणारे नेते आज शांत का?आमचं सरकार शेतकऱ्यांनचे म्हणून डोबारा पेटवणारे आघाडी सरकार आज शेतकऱ्याच्या शेतातलील उभी पीक जळत असताना आघाडी सरकार आज गप्पा का?

      अनेक निवडणुकीत नेते शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मिरवतात आज खरी शेतकऱ्यांनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे राजकीय मतभेद विसरून शेतकऱ्यांना साठी सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणे गरजेचे आहे.   महावितरणच्या अधिकाऱ्यांनी माणुसकी दाखवण्याची गरज आहे. आज शेतकऱ्याचे पीक जळल्यावर शेतकरी माणुसकीने वागेल याची अपेक्षा ठेऊ नये? असे आव्हान शिवसंग्रामचे  राजेंद्र आमटे यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

   

           

No comments