Breaking News

बीड शहराचा कायापालट करण्याचा आ. विनायकराव मेटे यांनी उचलला विडा..!


मूलभूत सुविधांसह बीड शहराच्या विकासाला गती देणार  : आ. विनायकराव मेटे यांची ग्वाही 

बीडच्या पांगरी रोड, नगर रोड लगत संभाजीनगर, तेलगाव नाका येथे 40 लक्ष रुपयांच्या काँक्रीट रस्ते, नाल्याच्या कामांचे आ. मेटेंच्या हस्ते भूमीपूजन

बीड :  शहरातील विविध भागात रखडलेल्या रस्ते, नाल्याच्या कामांसाठी माझ्या शहर विकास फंडातून पहिल्या टप्प्यात काल 50 लक्ष आणि आज 40 लक्ष रुपयांचा निधी नुसताच दिला नसून आज प्रत्यक्ष सिमेंट काँक्रीट रस्ते व नाल्याच्या कामांचे भूमीपूजन केले. बीडकरांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व शहराचा विकासाला गती देण्यासाठी भरघोस निधी देणार. अशी गाव्ही आ. विनायकराव मेटे यांनी दिली.


सोमवारी (दि.१५) बीड शहरातील काही भागात विकास कामांचे उर्वरित कामांचे आ. मेटे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.  यामध्ये नगररोड लगत असलेल्या संभाजीनगर, पांगरीरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व तेलगाव नाका येथे 40 लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्ते, नाल्याच्या विकास कामांचा शुभारंभ  करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कर्यक्रमात ते बोलत होते.

आ. मेटे म्हणाले की, बीड शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना व वाहनधारकांना कसरत करीत मार्ग काढावा लागत होता. यामुळे नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल होऊ लागले होते. सध्या आपल्या मताचं सरकार नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र यावर मात करून नागरिकांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा कशा पुरवता येतील. यासाठी मी प्रयत्न करीत आहे.


माझ्या शहर विकास फंडातून पहिल्या टप्प्यात शहरातील रविवारी नाळवडी नाका येथील रेणुका नगर, बार्शी नाका, बालेपीर, भाजी मंडई मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते आणि नाल्यांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. आज पुन्हा संभाजीनगर, पांगरीरोड व तेलगाव नाका येथे विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यापुढे विकासाला प्रथम प्राधान्य देणार असून बीड शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी व विकासाची गंगा आणण्यासाठी मी सर्वोत्तपरी  प्रयत्न करणार असल्याचे वचन आ. मेटे यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमास श्री धुताडमल बी एस ,अध्यक्ष आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ बीड. मगर व्ही.बी .,सचिव आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ बीड. श्री कागदे ये .यू.मुख्याध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय बीड, श्री आव्हाड व्हीं.जि.माजी मुख्याध्यापक. श्री गणेश वाघ ,संस्था चालक तथा मुख्याध्यापक यशवंत विद्यालय बीड .श्री नवनाथ नाईकवाडे, श्री संजय जी गिराम , स्थानिक ग्रामस्थ, श्री बन्सी हावळे, ज्येष्ठ शिक्षक, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय बीड.श्री पवार साहेब, श्री. मुंदडा, निलेशराव लोंढे , किशोरराव लोंढे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंग्रामचे नेते  सुधीर काकडे,अनिल घुमरे प्रभाकर कोलंगडे रामहरीभैया मेटे, ऍड. राहुल मस्के ,सुनील शिंदे , बबन माने, सुहास पाटील ,अक्षय माने, प्रशांत डोरले, विनोद कवडे यांनी परिश्रम घेतले.


No comments