Breaking News

जीप- दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार


होळ जवळील दुर्देवी घटना

गौतम बचुटे । केज 

भरधाव वेगाने निघालेल्या जीप व दुचाकीच्या समोरा समोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाल्याची दुर्देवी घटना केज अंबाजोगाई रोडवरील होळ जवळ सोमवारी (दि.१५) सकाळी सकाळी१०: ३० वाजण्याच्या सुमारास घडली.

अजिंक्य दत्ता धस (वय २०) वर्ष आणि महेंद्र भीमराव घुगे (वय २०) वर्ष दोघेही रा. होळ ता. केज असे मृतांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवरून क्र.(एम एच-४४ /व्ही-२१८९ ) लग्नासाठी अंबाजोगाईकडे जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या जीपला क्र.(एमएच-२४ /व्ही -४४८९ ) जोराची धडक दिली. यात अजिंक्य धस यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर महेंद्र घुगे यास रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. घटनास्थळी युसुफवडगाव पोलीस दाखल झाले होते.





No comments