Breaking News

फेरफार साठी शेतकऱ्यास लाच मागणाऱ्या तलाठी आठवले ना निलंबित करा - भाई अॅड.नारायण गोलेपाटील

माजलगाव:  तालुक्यातील शेत्र बोरगाव येथील तलाठी श्रीमती आठवले मॅडम यांचा कारभार त्यांचे पती श्री सुरज आठवले हे पहात असतात.काल दिनांक  ३  रोजी छत्र बोरगाव येथील शेतकरी राजेभाऊ रामभाऊ जाधव हे त्यांचे वडील निधन पावल्यामुळे मा. न्यायालयातून मिळालेल्या वारस प्रमाणपत्र आधारे ७/१२ पत्रकावर नाव नोंदण्यासाठी ,फेरफार नोंदणी कामी तलाठी श्रीमती आठवले मॅडम यांच्या ऑफिसला गेले असता त्यांचे पती सुरज रक्षे  व आठवले मॅडम हजर असताना राजेभाऊ जाधव यांनी न्यायालयाचे प्रमाणपत्र देऊन नाव सातबारा पत्रकाला नोंदविण्याची विनंती केली असता तलाठी आठवले मॅडम यांनी त्यांचे पती सुरक्षे यांचेकडे भेटा असे सांगितले.


 तेव्हा सुरज रक्षे यांनी तुम्हाला आठ हजार रुपये द्यावे लागतील आज नगदी चार हजार रुपये द्या व आठ दिवसानंतर तचार हजार रुपये द्या अशी मागणी केल्यानंतर राजेभाऊ जाधव यांनी त्यांना चार हजार रुपये दिले. शेतकरी कामगार पक्षाचे भाई अॅड.नारायण गोले पाटील यांना शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर शेतकऱ्याला घेऊन  तहसीलदार साहेब यांना तलाठयास  निलंबित करून तलाठी पती यांच्यावर  गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असून कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे, त्यावेळी भाई अॅड. नारायण गोले पाटील, राजेभाऊ जाधव, राजेभाऊ घोडके, संभाजी चव्हाण आदींची उपस्थिती होती.

No comments