Breaking News

मूलभूत सुविधांसह बीड शहराच्या विकासाला गती देणार : आ.विनायकराव मेटे यांची ग्वाही


बुंदेलपुरा, नवी भाजी मंडई येथे विकास कामाचे आ.मेटेंच्या हस्ते भूमीपूजन

बीड  : शहरातील विविध भागात रखडलेल्या रस्ते, नाल्याच्या कामांसाठी माझ्या शहर विकास फंडातून पहिल्या टप्प्यात काल 50 लक्ष लक्ष रुपयांचा निधी नुसताच दिला असून, आज प्रत्यक्ष सिमेंट काँक्रीट रस्ते व नाल्याच्या कामांचे भूमीपूजन केले. बीडकरांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व शहराचा विकासाला गती देण्यासाठी भरघोस निधी देणार. अशी गाव्ही आ. विनायकराव मेटे यांनी दिली.

रविवार (दि.१4) बीड शहरातील बुंदेलपुरा, नवी भाजी मंडये येथे विकास कामांचे  आ.मेटे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.  यावेळी आ. मेटे म्हणाले की, या भागातील नगरसेवक, विद्यमान न.पा.उपाध्यक्ष व स्वच्छता सभापती असूनही या भागात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. या भागात विकास कामांकरिता अद्याप त्यांनी कसल्याही प्रकारचा निधी आनलेला नाही. आपला वार्ड सोडून दुसऱ्याच वार्डात फोटोबाजी करतात.  अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना व वाहनधारकांना कसरत करीत मार्ग काढावा लागत होता. यामुळे नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल होऊ लागले होते. सध्या आपल्या मताचं सरकार नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र यावर मात करून नागरिकांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा कशा पुरवता येतील. यासाठी मी प्रयत्न करीत आहे.

माझ्या शहर विकास फंडातून पहिल्या टप्प्यात शहरातील रविवारी नाळवडी नाका येथील रेणुका नगर, बार्शी नाका, बालेपीर, भाजी मंडई मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते आणि नाल्यांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. आज पुन्हा संभाजीनगर, पांगरीरोड व तेलगाव नाका येथे विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यापुढे विकासाला प्रथम प्राधान्य देणार असून बीड शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी व विकासाची गंगा आणण्यासाठी मी सर्वोत्तपरी  प्रयत्न करणार असल्याचे वचन आ. मेटे यांनी यावेळी दिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेषेराव तांबे यांनी प्रयत्न केले. यावेळी शिवसंग्रामचे नेते अनिल घुमरे, विनोद कवडे, ॲड.राहुल मस्के, बबन माने, सुनिल शिंदे, अक्षय माने, प्रशांत डोरले, सौरभ तांबे, सुनिल धायजे, विजय डोके, अमजद पठाण, जाकीर हुसेन, एकनाथ कदम, शेख अजहर, यांच्यासह प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक भंडारे साहेब, राजपुत साहेब, भगत बुंदले सर, रनधिरसिंग बुंदले, व महिला वर्ग मोठ्या संख्येन उपस्थित होते.

No comments