Breaking News

केवडची आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम जिल्हास्पर्धेत निवड

केज :गाव स्वच्छ रहावे गावचा सर्वागिण विकास व्हावा या साठी राज्य सरकारने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या नावे सुरू करण्यात आलेली स्मार्ट ग्राम योजना सन -२०१९-२० मधे  राज्यात राबवण्यात आली होती. 

                    बीड जिल्यातुन केज तालुका स्तरावर मौजे केवडची गाव  स्मार्ट ग्राम म्हणुन निवड झाली आहे. आता जिल्हास्तरीय स्पर्धेत केवडचा समावेश झाला आहे.

तालुका स्तरावर २० लाखाचे बक्षीस मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक मिळवुन ६० लाखाचे बक्षीस मिळवण्यासाठी व गावच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थ सरसावले आहेत केवड गावचा जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग झाल्याने जि प बीडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दत्ता गिरी सह अधिकारी/कर्मचारी यांनी आज केवडला भेट देऊन  पाहणी केली. या वेळी सरपंच केशरबाई सर्जेराव सपाटे दिलीप सपाटे ग्रामसेवक कांबळे ग्रामपंचायत पदाधिकारी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


No comments