Breaking News

अंकुश बुंदेलेंसोबत आपचे कार्यकर्ते बुंदेलपुऱ्यातील घाणीबाबत उपजिल्हाधिकारी राऊत यांना भेटले

तात्काळ उपजिल्ह्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाला ऍक्शन मोडमध्ये आणले !

बीड :   बुंदेलपूरा, नवी भाजी मंडई येथील स्वच्छता करण्याबाबत वारंवार नगरपरिषदेला सामाजिक कार्यकर्ते अंकुश बुंदेले यांनी कळवले होते मात्र नगरपरिषदेने आतापर्यंत दुर्लक्ष केलेले आहे. आज याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी बुंदेले यांच्यासह आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहराध्यक्ष सय्यद सादेक, सचिव जमाले, शेरकर आदी गेले असता उपजिल्हाधिकारी राऊत यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाला याबाबत कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

   शहरातील बुंदेलपूरा, नवी भाजी मंडई या ठिकाणी कित्येक आठवडे स्वच्छताच केली जात नाही. अस्वच्छतेमुळे या भागात दुर्गंधी पसरत असून येथील स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. यामध्ये ...  १) नवी भाजी मंडईतील ओपन नाला स्वच्छता करणे.२) भाजी मंडईतील रस्त्यावरील वाढत्या हातगाड्यांची इतर ठिकाणी सोय करण्यात यावी.३) भाजी मंडईतील गाळे स्वच्छ व दुरुस्त करून रस्त्यावरील व्यापाऱ्यांना सुरु करून द्यावेत.४) या भागाची दैनंदिन स्वच्छता करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश बुंदेले, शहराध्यक्ष सय्यद सादेक, सचिव रामधन जमाले,रामभाऊ शेरकर, बुंदेलपुरा येथील जगदीश परदेशी आदींसह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

No comments