Breaking News

‌दिंद्रुड ग्रामपंचायतला अजय कोमटवार सरपंच पदी शिक्कामोर्तब

दिंद्रुड ला प्रथमच उच्चशिक्षित मिळणार सरपंच

संतोष स्वामी। दिंद्रुड

दिंद्रुड ग्रामपंचायत ला अनुसूचित जमाती  साठी सरपंच पद राखीव आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ अजय कोमटवार व त्यांचा पॅनल बहुमताने विजयी झाल्याने सरपंच पदासाठी अजय दिलीपराव कोमटवार यांच्या नावाने शिक्कामोर्तब झाले असुन दिंद्रुड ला उच्च शिक्षित सरपंच मिळत आहे. 

पंधरा ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणूकीत येथील माजी सरपंच दिलीप कोमटवार यांच्या नेतृत्वाखाली ११ उमेदवार तर जनसेवा ग्रामविकास आघाडी चे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंच पदासाठी अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गात विजयी झालेले अजय कोमटवार हेच सरपंच होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. अजय दिलीपराव कोमटवार हे ३१ वर्षीय युवा सरपंच पदी विराजमान होत आहेत. एम. सि.ए.ची पदवी प्राप्त उच्च शिक्षित तरुण नेतृत्व गावाचा चेहरामोहरा अधुनिक करण्यासाठी दिंद्रुड च्या सेवेत पुढील पाच वर्षे काम करणार आहेत. 

"मला मिळालेल्या संधीचा योग्य वापर करत दिंद्रुड च्या शैक्षणिक, सामाजिक, अधुनिक ग्राम म्हणून दिंद्रुड चा नावलौकिक करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दिंद्रुड चा सार्वभौम विकास करत आदर्श ग्रामपंचायत करण्याचा माझा मानस आहे. "

- अजय दिलीपराव कोमटवार


No comments