Breaking News

विधायक काम करणार्‍यांचा मराठवाडा साथी नेहमीच गौरव करतो-ना.धनंजय मुंडे

परळी भुषण पुरस्कार, बाल धमाल स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात 

परळी : चांगले व विधायक काम करणार्‍यांची समाज नेहमीच दखल घेत असतो. परंतु, असे काम करणार्‍यांचा गौरव करुन त्यांना समाजात आणखी मोठे स्थान देण्याचे काम दैनिक मराठवाडा साथी नेहमीच करत असून हा केवळ सन्मान नाही तर आपण केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे, एका वर्तमानपत्राने दिलेली कौतुकाची, शाबासकीची थाप आहे असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. परळी भुषण हा पुरस्कार भविष्यात चांगले काम पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा आहे असे सांगत ना.धनंजय मुंडे यांनी सर्व परळी भुषण, विशेष गौरव व सेवा पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.


दै.मराठवाडा साथीच्या वतीने आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी भुषण विशेष गौरव व सेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. बाल धमाल 2021 ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय दौंड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी हिरालाल कराड, नगराध्यक्षा सौ. सरोजिनीताई हालगे उपस्थित होते.

आज मराठवाडा साथीच्या वतीने परळी भुषण पुरस्काराने प्रा.डॉ. माधव रोडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश कुर्मे, उद्योजक जाफर खान उस्मान खान, माजी उपनगराध्यक्षा सौ. निलाबाई रोडे, ज्येष्ठ शिक्षक तथा रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य जी.एस.सौंदळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विशेष गौरव पुरस्कार प्रसिद्ध पैहलवान तथा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे, कवि तथा साहित्यीक अनंत मुंडे यांना ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सेवा गौरव पुरस्काराने संगीत प्रशिक्षक चंद्रकांत कळसे गुरुजी, पत्रकार तथा जाहिरात प्रतिनिधी आनंद हडबे, स्वच्छता सेवक दगडू मस्के यांचा सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन या सर्वांचा गौरव करण्यात आला.

आपल्या भाषणात पुढे बोलतांना ना.धनंजय मुंडे यांनी सर्वच सत्कारमुर्तींच्या कामाचे कौतुक केले. मी साथी परिवाराचा सदस्य असल्याचे सांगत परळी भुषण पुरस्कार हा अत्यंत कौतुकाचा आणि चांगले काम करणार्‍यांसाठी कोणी तरी आपली दखल घेतो यामुळे तेवढाच महत्वाचा असल्याने परळी भुषण पुरस्काराची परंपरा पुढेही चालूच ठेवा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या चौफेर कामाचा ना.धनंजय मुंडे यांनी आवर्जुन उल्लेख केला.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना आ. संजय दौंड यांनी सांगीतले की, मराठवाडा साथी हे उपक्रमशील वृत्तपत्र असून सामाजिक बांधीलकी, गुणवंतांचे कौतुक करीत असतांनाच शिक्षण, समाजकारण, राजकारण, उद्योग, महिला, आरोग्य अशा सर्वच क्षेत्राला न्याय देण्याचे काम केले असून त्याचा आपल्याला आनंद वाटतो असेही ते म्हणाले. आ.संजय दौंड यांनी सांगीतले की, मी मागील कित्येक वर्षापासून साथी परिवाराशी निगडीत असून साथी परिवार म्हणजे सर्वांचाच एक आधार असून मी सुद्धा या परिवाराचा एक सदस्य असल्याचे सांगीतले.

या कार्यक्र्रमात बाल धमाल स्पर्धेतील बक्षीस विजेत्यांना बक्षीस वितरण, कु. प्राजक्ता गायकवाडसह विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्काराला दीप प्रज्वलन, श्री सरस्वती पूजन, मुख्य संपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व पाहुण्यांचे स्वागत डीएफसीचे संचालक सुरज सतिश बियाणी, व्यवस्थापक ओमप्रकाश बुरांडे, शिक्षक आरगडे, सौ. चेतना गौरशेटे, बीड जिल्हा प्रतिनिधी संदीप बेदरे, अतुल दुबे यांच्यासह अनेकांनी केले. प्रास्ताविक वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, आभार शेखर अंकल तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कार्यकारी संपादक प्रशांत प्र.जोशी यांनी केले.

No comments