Breaking News

खडकतकरांच्या प्रेमाची उतराई विकास कामातून करणार - आ. बाळासाहेब आजबे

आष्टी :  मी आडचणीत असताना खडकत गावाने मला नेहमी साथ दिली आहे आमदार झाल्यानंतर पहिले काम हे खडकत गावात मंजूर करण्यात आले मागील एक वर्षाचा काळ हा कोरोना आजारामुळे कोठेही फिरता आले नाही परंतु आज खडकत येथे भव्य असे झालेले स्वागताने  मी भारावून गेलो आहे खऱ्या अर्थाने आज वीस लक्ष रुपये कामाचे शुभारंभ करत असल्याचा आनंद आपल्याला होत आहे ,खडकत,बळेवाडी ,व सांगवी आष्टीकरांच्या प्रेमाची उतराई विकास कामाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी खडकत येथे विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलताना सांगितले.

       आष्टा गटातील खडकत ,बाळेवाडी व सांगवी आष्टी येथे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून 28 लक्ष रु विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला  यावेळी खडकत ग्रामस्थांनी आ, बाळासाहेब आजबे यांचे ढोल, ताशा, व फटाक्यांच्या आतशबाजीत जेशिबिने फुले उधळत भव्य स्वागत  केले. यावेळी जि. प माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी ,राम खाडे, प. स सदस्य संदीप, अस्वर, यश आजबे, संदीप सुंबरे,सुधीर जगताप, भाऊसाहेब घुले, नाजिम शेख, बबन डोके , तात्या जगताप, नवनाथ आंधळे ,शहाजी भोसले, परमेश्वर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती, पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की मागील एक वर्षाच्या काळात कोरोनाच्या महाभयंकर साथीमुळे विकास निधी कुठेही देता आला नाही अनेक दिवस कोणाच्या भेटीगाठी घेता आल्या नाहीत याची खंत आपल्या मनामध्ये  नक्कीच आहे.

जानेवारीपासून थोडे थोडे कामे सुरळीत होत आहेत त्यामुळे आपण विकास कामाचा शुभारंभ व गावागावात जाऊन आडी अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न  करीत आहे ,मतदारसंघातील प्रत्येक गावात आपण काम दिले आहे यापुढेही मोठ्या प्रमाणात विकास कामावर भर दिला जाणार आहे आपल्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचवा त्या मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करील विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात यापुढेही निधी मंजूर करून घेतला जाईल परंतु कामे करताना ही दर्जेदार झाली पाहिजेत हे कार्यकर्त्यांनी व काम करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे खडकत येथे जनावरांच्या दवाखान्यासाठी ही प्रस्ताव दाखल करण्यात आला असून त्यासाठी लवकरच मंजुरी मिळणार असल्याचेही यावेळी  आ. बाळासाहेब आजबे यांनी सांगितले. खडकत येथे दलित वस्ती सिमेंट रस्ता लोकार्पण पाच लक्ष, शनी मंदिर पेविंग ब्लॉक बसवणे तीन लक्ष, कब्रस्तान दुरुस्ती करणे तीन लक्ष रुपये, महंत महादेव महाराज मंदिर सभामंडपात पाच लक्ष रुपये ,ग्रामपंचायत सीएससी खोली बांधकाम चार लक्ष रुपये, बळेवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर सभामंडप चार लक्ष रुपये ,सांगवी आष्टी येथे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसवणे चार लक्ष रुपये, अशा 28 लक्ष रुपये किमतीच्या विकास कामांचा शुभारंभ यावेळी आमदार बाळासाहेब आजबे या यांच्या हस्ते करण्यात आला.

 खडकत येथील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारगाव जो, गणाचे गण प्रमुख सतीश सोले ,सरपंच रामदास उदमले, तात्यासाहेब जेवे,अतुल शिंदे,  संजय निर्मळ  ग्रामपंचायत सदस्य राजू कुरेशी यांनी परिश्रम घेतले,  कार्यक्रमासाठी अजय जेवे ,राहुल जेवे ,विलास फुले, अरिफ तांबोळी आबा पवार राजेंद्र जाधव शहाजी बंडगर गोरख आप्पा जेवे संजय पवार शांतीलाल काटे अमोल निर्मळ राजु परदेशी अनिल यादव ईश्वर भोसले बाबू बळे कारभारी भोसले दादासाहेब भोसले उपसरपंच तात्यासाहेब कदम सरपंच बाळू मेंगडे सुनील खेडकर अंबादास खेडकर महेंद्र खेडकर प्रविण खेडकर संदीप खेडकर जयदीप खेडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments