Breaking News

बीड जिल्हा वासीयांनो सावधान! रुग्णसंख्या वाढतेय; कोरोनाविषयक नियमांचे पालन करा - धनंजय मुंडेंचे आवाहन

बीड  : बीड जिल्हा वासीयांनो सावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत असून आपण या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. मास्कचा सतत वापर करा, शासकीय नियमांचे पालन करा. गर्दी करणे टाळा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा काही प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. दररोज १५-२० च्या आसपास असलेली रुग्णसंख्या एकदम ५० च्या पार गेलेली आकडेवारी गेल्या आठवड्यात समोर आल्याने या आकडेवारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत वाढत्या रुग्णासंख्येकडे लक्ष वेधले होते. बीड जिल्ह्यात देखील वाढती रुग्णासंख्या लक्षात घेत  मास्क वापरण्याच्या सक्तीसह काही नियम नव्याने लागू करण्यात आले आहेत.  जिल्हा प्रशासनाकडून गर्दी जमण्याची ठिकाणे तपासणीसाठी अधिकाऱ्यांची पथके नेमण्यात आली असून, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुलीही करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी  देखील जबाबदारीने कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक असून, मास्क-सॅनिटायझर वापरणे, गर्दी टाळणे आदी बाबींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

No comments