Breaking News

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे कायमस्वरूपी अधिकारी मिळावा

आम आदमी पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री कडे मागणी

बीड : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे मागील दोन वर्षांपासून कायमस्वरूपी अधिकारी नाही. याबाबतीत वेळोवेळी शासन व प्रशासनाला निवेदना मार्फत मागणी केलेली आहे. पंरतु दखल घेतली जात नसल्याने आज आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारीनां निवेदन देण्यात आले.


 नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या आर. टी. ओ. कार्यालय बीडचे रडगाणे अजूनी ही चालूच आहे. बीडच्या पालकमंत्र्यांनी या बाबतीत निष्क्रियेता दाखवलेली आहे. फक्त वर्तमानपत्रात आधिकारी आल्याचे श्रेय घेण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पंरतु आधिकारी काही आला नाही. आधिकारी नसल्याने कर्मचार्‍यांवर वचक नाही. म्हणून वहान मालकांची व चालकांची प्रचंड हाल होत आहेत. म्हणून आज आम आदमी पार्टी तर्फे एक निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले. या वेळी आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, रिपब्लिकन पिपल्स फ्रंट चे अॅड. बक्शु अमीर शेख, अॅड. पी. के. वीर,आम आदमी पार्टी चे जिल्हा सचिव रामधन जमाले,टॅक्सी युनियन चे अध्यक्ष बाबू भाई, आम आदमी पार्टी चे शहराध्यक्ष सादेक भाई, प्रमोद सारडा, जाकेर चौधरी, बंडू गाडे, आसाराम खापे, राजू पुंड, रामभाऊ शेरकर आदी हजर होते.

No comments