Breaking News

कंटचिंचोली, लुखामसला, दैठण गावे झाली चकाचक

'बीएम' कडून तर्फे पाच दिवसांपासून गेवराई तालुक्यातील विविध गावात राबविल जातंय श्रमदानातून स्वच्छता अभियान

शिवजयंती निमित्त बीएम प्रतिष्ठानच्या बाळासाहेब मस्के यांचा स्तुत्य उपक्रम गेवराई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बी.एम. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून गेवराई तालुक्यातील विविध गावांमध्ये श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविल जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहीमेस ग्रामस्थांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद मिळतोय. या अभियानांतर्गत शुक्रवारी (दि.१०) कंटचिंचोली, लुखामसला, दैठण गावचा परिसर स्वच्छ करून गावे चकाचक झाली.


 बातमीचा संपूर्ण  व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

गेवराई तालुक्यात बी.एम. प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. यंदाही प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४१ व्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. श्रमदानातून स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले असून गेल्या पाच दिवसांपासून गेवराई तालुक्यातील विविध गावात अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवारी कंटचिंचोली गावापासून स्वच्छता मोहिमेस सुरवात करण्यात येवून दैठण, लुखामसला या गावांमध्येही श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. बी.एम.प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाला कटचिंचोली, दैठण, लुखामसला येथील युवकांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. गाव विकासासाठी आणि स्वच्छ व सुंदर गाव करण्यासाठी श्रमदानातून स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या आणि सहकार्य केलेल्या सर्व शिवभक्तांचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी आभार मानले.


No comments