Breaking News

युवा उद्योजक संघाने केलं धारूरमध्ये चिकन फेस्टीवल" चं आयोजन


नागरिकांनी बर्डफ्ल्यूच्या अफवांवर विश्वास  ठेवू नये,यासाठी  बीड जिल्ह्यात  राबवणार "चिकन फेस्टीवल" अभियान 

"चिकन फेस्टीवल" अभियानाची बोडखा गावातील गोरख तिडके यांच्या पोल्ट्री फार्मवरुन सुरवात

बीड :  बर्डफ्ल्यूच्या अफवेमुळे संकटात सापडलेल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांना धीर देण्यासाठी व सावधानतेने चिकन खाल्याने बर्डफ्ल्यू होत नाही हा सामाजिक संदेश देण्यासाठी  युवा उद्योजक संघाने "चिकन फेस्टीवल" अभियान सुरू केले आहे. याची सुरुवात युवा उद्योजक संघाचे सदस्य गोरक्षनाथ तिडके यांच्या भाग्यश्री पोल्ट्री फार्म,बोडखा,तालुका धारूर येथे कार्यक्रम घेऊन केली.


यावेळी बर्डफ्ल्यूच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे अवाहन युवा उद्योजक संघाचे अध्यक्ष दत्ता जाधव,युवा उद्योजक संघाचे सचिव धनंजय गुंदेकर,युवा उद्योजक संघाचे सदस्य गोरक्षनाथ तिडके आदींनी केले आहे.या कार्यक्रमास संभाजी फड,नितीन केंद्रे,शिवाजी बडे,राजेश मोरे,भागवत मोरे,संतोष तिडके,अंबादास तिडके,सुरेश तिडके,अमोल गवळी आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थित आयोजकासह सर्वांनी चिकन बिर्याणी खात,बर्डफ्ल्यूच्या अफवांवर विश्वास ठेवू नका,असे अवाहन जिल्ह्यातील नागरिकांना केले.


No comments