न.प.गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने भजन संध्या कार्यक्रम उत्साहात
परळी :- न.प.चे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने 30 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक शांतारामजी चिगरीकर यांचे शिष्य संगितरत्न प्रा. राहुलकुमारजी सोनवणे व भजन सम्राट कुमारजी पुरानिक यांचा भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला.
तबलाची साथ दत्ता महाराज पुरी यांनी दिली टाळाची साथ सुरेश मोगरे यांनी दिली. आलेल्या सर्व मान्यवरांना गायन वादनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ठुंबरी भजन, नाट्यगीत,अभंग गवळण गायन संपन्न झाले. झाला. या कार्यक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. राजाराम मुंडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.काॅ चे ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख याची उपस्थिती होती. दीप प्रज्वलन महंत संत धुराबाई व नगरसेवक चंदुलालजी बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, कृ.उ.बा.स.चे संचालक माऊली गडदे, प्रा. अतुल दुबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शंकर कापसे, सं. गा.नि.यो.चे सदस्य सूर्यकांत मुंडे, वसंत राठोड, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या परळी शहर अध्यक्षपदी जगदीश शिंदे व शहर सचिवपदी प्रवीण फुटके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री ह.भ.प. मनोहर महाराज मुंडे प्रा. प्रकाश फड, ह-भ-प सच्चिदानंद महाराज गीते, ह भ प श्रीराम महाराज मुंडे, ह भ प माधव महाराज उखळीकर, ह भ प कृष्णा महाराज रेवले, ह-भ-प वृक्षराज महाराज आंधळे, ह-भ-प सुरेश महाराज मोगरे सर, ह भ प राजेभाऊ महाराज आंधळे, सुरेश महाराज सातपुते, ह भ प आकाश महाराज गिरी, ह भ प नामदेव महाराज गिरी, ह भ प दत्ता महाराज पुरी, ह भ प जनक महाराज कदम,ह.भ.प.गोविंद महाराज मुंडे, माऊली महाराज कतारे, ग्रामपंचायत सदस्य युनुस बेग, गंगाधर नागरगोजे, यांच्या उपस्थितीमध्ये भजन संध्या कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये स्वर्गीय मोहनलालजी बियाणी यांच्या स्मरणार्थ चंदुलाल बियाणी, यांनी कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेस कॅम्पुटर भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ कवी राजकुमार यल्लावाड सर यांनी केले तर आभार ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनीव
मानले.Zzzzzzzzzzzzzz
No comments