Breaking News

शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा:-राजेंद्र आमटे

तात्काळ सक्तीची वीज बिल वसुली थांबवा अन्यथा शिवसंग्राम रस्त्यावर उतरेल 
बीड :  करोना महामारी मुळे शेतकरी शेतमजूर यांचे अतोनात नुकसान झाले आहे. करोनाच्या नुकसनातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याच्या शेतातील कापूस व अन्य पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकरी करोना व अतिवृष्टी भयंकर संकटात असताना सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी सक्तीची वीज बिल वसुली सुरू केली आहे हे दुर्दैवी आहे.           सरकार शेतकऱ्यांनकडून करत असलेली सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी व शेतकऱ्यांना वीज बिल माफी देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन शेतकऱ्यांना वीज बिल माफ करावे व तात्काळ सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी अन्यथा शिवसंग्राम शेतकऱ्यांनासाठी  मा. आ.विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे राजेंद्र आमटे,गोपीनाथ घुमरे बाजार समिती संचालक,गणेश साबळे (सरपंच),विलास मोरे,विष्णू कणके,प्रशांत थोरात,कचरू कदम,महादेव बहिर,संतोष पवार,आकाश शेळके,बाबू सुरवसे,अनिरुद्ध साळवे,सुरेश बागलाने, आदींच्या वतीने मागणी करण्यात आली.

      

No comments