Breaking News

परळीकरांना मुबलक पाणी पुरवठा करु-उर्मिला मुंडे


परळी : परळी शहरातील नागरीकांना येणार्या काळात मुबलक पाणीपुरवठा करु यासाठी किरकोळ दुरुस्तीसाठी तत्पर यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती उर्मिला मुंडे यांनी सांगितले.

 पाणी पुरवठा सभापती उर्मिला मुंडे यांनी नागापुर येथील जलशुध्दीकरण केंद्र व वाण प्रकल्पास भेट देवुन पहाणी केली.परळी शहराला पाणीपुरवठा करणार्या नागापुर येथील वाण प्रकल्पात सध्या मुबलक पाणीसाठा असुन पाण्याचे योग्य नियोजन लावण्यात येत आहे.मुंडे यांनी यावेळी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची बैठक घेवुन सुरळीत पाणी पुरवठ्यात येणार्या अडचणी जाणुन घेतल्या.पाईपलाईन नादुरुस्त होणे,नविन पाईपलाईन टाकणे,जलशुध्दीकरणासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा केली.येत्या काही महिन्यात पाण्याची मागणी वाढणार असुन त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे उर्मिला मुंडे यांनी सांगितले.

यावेळी न.प.कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे,पाणीपुरवठा विभाग प्रमुख वा.ना.जाधव,इंजि.साळवे,शिक्षण सभापती गोपाळ आंधळे,बांधकाम सभापती अन्नपूर्णा आडेपवार,तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष गोविंद मुंडे ,नगरसेवक आयुब पठाण,संजय फड,नागापुरचे सरपंच मोहन सोळंके,भागवत मुंडे,कल्याण मुंडे,सुभाष पुजारी,बालाजी फड,ऋषिकेश मुंडे,नरेश मुंडे,अजय खामकर,महेश मुंडे,दीपक कराळे, जगदीश ताठे आदी उपस्थित होते.

No comments