आष्टीच्या फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू उत्साहात
आष्टी : आनंद चारिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी. आष्टी (डी. फार्मसी)व कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रीसर्च (बी.फार्मसी) आष्टी संस्थापक अध्यक्ष मा. भिमरावजी धोंडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी या व्यवसायिक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी मिळण्यासाठी आष्टी येथे पदविका व पदवी या शिक्षणाचे हे दोन कॉलेजची स्थापना केले. नुकताच सोमवार दिनांक ८ फेब्रुवारी या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू हा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा भाग की ज्या कॉलेजमधून विद्यार्थ्यांनी आपलं फार्मसी शिक्षण पूर्ण केलेल आहे त्या कॉलेज मार्फत विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरी लागणं खूप वैशिष्टपूर्ण गोष्ट या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून पार पडली. सिंसान फार्मासुटिकल प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्माण कंपनीने नुकताच या दोन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑनलाईन इंटरव्यू घेतले. या इंटरव्ह्यूमध्ये फार्मसी कोर्स उत्तीर्ण झालेल्या जवळजवळ 40 ते 45 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यार्थी कोर्स पूर्ण झाल्यानंतर लगेच कॉलेज मार्फत या कॅम्पस इंटरव्ह्यूचे नियोजन करून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून देणे असे महत्त्वपूर्ण काम या कॉलेज मार्फत केले जात आहे.या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष मा.भिमरावजी धोंडे , संचालक अजय (दादा) धोंडे , युवा नेते अभय धोंडे, सर्व प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत , शिवदास विधाते , दत्तात्रय गिलचे , माऊली बोडखे , शिवाजी वनवे ,संजय शेंडे यांनी अभिनंदन केले. तसेच या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल श्री.पडाळकर सर, श्रीमती मेहता मॅडम, श्री पाटील सर ( सिंसान फार्मासुटिकल कंपनी) आणि सिंसान या औषध निर्माण कंपनीचे सर्व कर्मचारी यांचे संस्थापक अध्यक्ष, सर्व प्रशासकीय अधिकारी, कॉलेजचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्ग यांनी आभार मानले. यापुढेही या कॉलेजमध्ये इथून पाठीमागे ज्या पद्धतीने कॅम्पस इंटरव्ह्यू झाले तसेच यापुढेही कॉलेज मार्फत असे कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रोडक्शन ,मार्केटिंग, संशोधन) वेगवेगळ्या औषध निर्माण कंपनी मार्फत घेतले जातील, कॉलेजमध्ये होणार आहेत असे कॉलेजचे प्राचार्य सुनील कोल्हे यांनी सांगितले. या सर्व कॅम्पस इंटरव्ह्यू चे नियोजन प्लेसमेंट ऑफिसर कोपनर सर,श्री साबळे सर व श्री मुळे सर यांनी केले.
No comments