Breaking News

रक्तदान शिबिरात 80 तरुणांचे रक्तदान - मनोज पाचांग्रे

बीड  : शहरातील बार्शीनाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 80 तरुण दात्यांनी रक्तदान करुन एक वेगळा पायंडा पाडत शिवजयंती साजरी केली. 


छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन पापनेश्वर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विक्की पाचांग्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करु करण्यात आले. तर प्रमुख पाहूणे म्हणून संपादक उत्तम ओव्हाळ यांची प्रमुख उपस्थिती होते. यानंतर  शिबिरात 80 तरुणांनी रक्तदान करुन महाराजांना मानाचा मुजरा कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करत शिवजयंती साजरी केली. या कार्यक्रमाचे आयोजन पापनेश्वर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला अनिल धनुरे,  माने  दिनेश, खांडे , शेखर बनसोडे, अमोल गायकवाड, प्रकाश जोगदंड सचिन चव्हाण, कृष्णा पिंगळे, नितीन घायाळ, अमोल गायकवाड,मनोज वडमारे, महेश जगताप, रोहन पतंगे सह परिसरातील नागरिक, शिवप्रेमी उपस्थित होते.


No comments