Breaking News

भारतीय जनगणना 2020-21 साठी नियुक्त केलेल्या 44 तांत्रिक सहाय्‍यकांना 24 तासात शिवसंग्रामकडुन न्याय

शिवसंग्रामचे अक्षय  माने व सौरभ तांबे यांच्या पाठपुराव्याला यश..
 बीड  : बीड जनगणना विभागातील तांत्रीक सहायक यांना मार्च 2020 पासून कुठलेच मानधन मिळाले नाहीकोरोना काळातही या तांत्रिक सहाय्‍यकांनी काम केले आहे. 30 जुलै 2020 ला कोरोना मुळे जनगणना कामास स्थगिती मिळालीपरंतु 5 महिन्याचे थकीत वेतन दिले नाही. या साठी रितसर सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयनगर परिषदनगरपालिका येथे कार्यरत असलेल्या तांत्रिक सहायकांनी वेळीवेळी जिल्हाधिकारी आणि निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेतलीमार्च-2020 ते 31 जुलै 2020 या 5 महिन्याचे मानधन मिळावे यासाठी अनेकदा विनंत्या केल्या, मात्र प्रशासना कडून कुठलीच कारवाई झाली नाही. फक्त आश्वासन दिल्या गेले. सर्व तालुक्यातील तांत्रीक सहायकांनी पगार मिळावा. यासाठीदिनांक 10 फेब्रुवारी रोजी शिवसंग्रामचे अक्षय माने व सौरभ तांबे यांची भेट घेतली व तांत्रिक सहायक यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेतत्यांच्या भावनाआणि गांभीर्य लक्षात घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी,  ताबडतोब यात लक्ष देत न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन जिल्हाधिकारी जगताप यांच्याकडे सादर केले. 


संबंधित बातमीचा व्हिडीओ पहा

या साठी सर्व जिल्ह्यातील तांत्रिक सहायक यांच्या व्यथा अक्षय माने जिल्हाधिकारी यांना ऐकवल्याकुणाच्या घरची लाईट बील न भरल्या ने लाईट कापली गेली होतीकुणाच्या घरी पैश्या अभावी आजारी व्यक्ती ला चांगली सुविधा मिळत नव्हतीपैसे नसल्याने वेळोवेळी तालुक्याच्या ठिकाणावरून येणे शक्य नव्हते. ह्या सर्व अडचणी लक्षात आनुन ताबडतोब न्याय मिळवून देण्यासाठी कलेक्टर साहेबांना विनंती केली. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेताच मा. जिल्हाधिकारी जगताप साहेब  यांनी शिष्ठमंडळाची आणि सर्व तांत्रिक सहायक यांची कॉन्फरन्स रूम मध्ये बैठक बोलावली आणि मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी 15 दिवसांत मानधन खात्यावर जमा होईल असे सांगितले. अक्षय माने यांच्या पाठपुराव्यामुळे 44 तांत्रिक सहायकांचा पगार मिळाला आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व तांत्रीक सहायकयांच्या कडून अक्षय माने व सौरभ तांबे सह शिवसंग्रामचे आभार मानले आहे. यावेळी तांत्रिक सहायक वैभव गवते, शुभम वाकडे, रवी पांगरे, श्रीधर तांदळे, अनिल सानप, योगेश बागलाने, शुभम सरवदे सह आदी उपस्थित होते.Z

No comments